Tarun Bharat

भगवंत मान यांनी भरला उमेदवारी अर्ज

आईसोबत पोहोचले ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित भगवंत मान यांनी धूरी विधानसभा मतदारसंघाकरता उमेदवारी अर्ज शनिवारी भरला आहे. मान हे स्वतःच्या आईसोबत धूरी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. काँग्रेस आमदार दलवीर सिंह गोल्डी यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहेत. मान हे दुसऱयांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर दोनवेळा ते संगरूरचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

2012 मध्ये मान यांनी लहरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास शिरोमणी अकाली दल सोडून आलेल्या मनप्रीत सिंह बादल यांच्यासोबत केला होता. मनप्रीत बादल यांनी पीपल्स पार्टी ऑफ पंजाब स्थापन केला होता, जो नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केला होता. त्यानंतर भगवंत मान यांनी 2014 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश करत संगरूरमधून लोकसभा निवडणूक लढविली होती.

भगवंत मान यांनी पहिली निवडणूक 2012 मध्ये लहरा विधानसभा मतदारसंघातून लढली होती. परंतु त्यावेळी माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल विजयी झाल्या होत्या. त्यादरम्यान भट्टल यांना 44,706 मते, शिअद उमेदवार सुखवंत सिंह यांना 41351 मते आणि भगवंत मान यांना 26136 मते मिळाली होती.

संगरूरमधून दोनवेळा विजयी

भगवंत मान यांनी 2014 मध्ये संगरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांनी 5 लाख 33 हजार 237 मते प्राप्त करत विजय मिळविला होता. सुखदेव सिंह ढींडसा यांना 3 लाख 21 हजार 516 मते मिळू शकली होती. 2019 मध्ये मान यांनी पुन्हा संगरूरमधून विजय मिळविला होता.

Related Stories

बिहारमध्ये पुन्हा येणार रालोआचे सरकार!

Patil_p

मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

Patil_p

लवकरच इंफाळपर्यंत धावणार रेल्वे : पंतप्रधान मोदी

Patil_p

नियमित तपासणीसाठी सोनिया गांधी रुग्णालयात

Patil_p

कोरोनाने मृत्यू झाल्यास किमान 1800 रुपये पेन्शन

Patil_p

निर्भय क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण

Patil_p