Tarun Bharat

भगवद्गीता, आत्मनिर्भरता संदेशासह इस्रोचे यशस्वी उड्डाण

Advertisements

नववर्षातील प्रथम मोहीम यशस्वी, 19 उपग्रह झाले आकाशस्थ 

श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे नववर्षातील प्रथम प्रक्षेपण यशस्वी ठरले आहे. रविवारी या संस्थेच्या ‘पीएसएलव्ही सी 51’ या अवकाशयानाने 11 विदेशी उपग्रहांसह 19 उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रक्षेपित केले. यात ब्राझीलचा एक तर अमेरिकेचे 13 उपग्रह आहेत. ब्राझीलचा उपग्रह ऍमेझोनिया-1 या नावाचा आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आले. शनिवारी या प्रक्षेपणाचा काऊंटडाऊन सुरू झाला होता. रविवारी सकाळी 10 वाजून 24 मिनिटे या पूर्वनियोजित वेळेवर उपग्रहांना घेऊन अवकाशयान झेपावले.

पीएसएलव्ही (पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल किंवा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) या अग्निबाणाचे हे 53 वे उड्डाण होते. ब्राझीलचा ऍमेझोनिया 1 हा उपग्रह या वाहनावरील मुख्य ‘प्रवासी’ होता. त्याचे वजन 637 किलो आहे. त्याशिवाय 18 छोटे उपग्रह होते. ब्राझीलमध्ये होणाऱया अनियंत्रित वृक्षतोडीवर लक्ष ठेवणे आणि त्या देशात बहुविध पीक पद्धतीला चालना देणे ही या उपग्रहाची कार्ये आहेत. अमेरिकेचे 9 उपग्रह हे लहान आकाराचे आहेत.

कोरोनामुळे अतिदक्षता

यानाच्या प्रक्षेपणाच्या वेळी आरोग्य विषयक नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले. शारीरिक अंतर राखूनच एकमेकांशी संपर्क करण्यात आला. शास्त्रज्ञांची संख्याही प्रक्षेपण केंद्रावर कमीत कमी ठेवण्यात आली होती. कोरोना उद्रेकाची स्थिती लक्षात घेता ही दक्षता बाळगण्यात आली होती.

भगवद्गीतेसह आत्मनिर्भरता संदेशही…

भारताने शक्य तितक्या सर्व क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर होण्याचा निर्धार केला आहे. सर्वांनी कसून प्रयत्न केल्यासच हे लक्ष्य साध्य होणार आहे. यासाठी भगवद्गीतेतील कर्मयोगाचे अनुसरण करावे लागणार आहे. हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी या यानावर अग्रभागी भगवद्गीतेची डिजिटल प्रत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह आत्मनिर्भरतेचा संदेश कोरण्यात आला आहे. या संदेशासह या यानाने रविवारी सकाळी अवकाशात भरारी घेतली.

विद्यार्थ्यांची कीर्तीही अवकाशात

पीएसएलव्ही 51 सी या यानावर विद्यार्थ्यांनी बनविलेला एक उपग्रहही आहे. स्पेसकिड्स् या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप कंपनीने तो तयार केला असून त्याचे कार्य दूरसंचार आणि देखरेख असे आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे बोलले जात आहे.

Related Stories

दिल्लीत 2,871 नवे कोरोना रुग्ण; 35 मृत्यू

Tousif Mujawar

सरकारी नोकरी मिळाली, पतीला विसरली

Patil_p

कृषी विधेयकप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस

Omkar B

जम्मू : कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द

Tousif Mujawar

नक्षलवाद्यांच्या तावडीतून सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह यांची सुटका

Tousif Mujawar

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Patil_p
error: Content is protected !!