Tarun Bharat

भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाला गर्दी, आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements

तरुण भारत संवाद वार्ताहर / पंढरपूर

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला (रांझणी ता. पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. याप्रकरणी या सभेसाठी परवानगी घेणारे विजयसिंह बाळासाहेब देशमुख (रा.कासेगाव, ता. पंढरपुर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भारत भालके या उमेदवाराचे प्रतिनिधी विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी (रांझणी ता. पंढरपुर) येथील (रविवार दि.4 रोजी) झालेल्या प्रचार सभेस व स्पीकर लावणेसाठी पत्राद्वारे परवानगी मागणी केली होती. व्यवस्थापन यांनी नेमुन दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रचारसभेस परवानगी दिली होती.

सभेच्या वेळी व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे, एस.यु. नागटीळक, फोटोग्राफर अजित देशपाडे, वाहन चालक पंडीत इंगोले हे तिथे हजर होते. सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे सभेचे आयोजक यांनी उल्लघंन केल्याचे या पथकाला निदर्शनास आले. यामुळे विस्तार अधिकारी व व्हीएसटी पथक प्रमुख अशोक वैजीनाथ नलवडे यांनी विजयसिंह देशमुख यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Stories

सोलापुरातील ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे निधन

Abhijeet Shinde

भाजप नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

prashant_c

दोनशे महिने सरकार पडणार नाही – मंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

जळगाव : 14 वर्षात 1679 शेतकऱयांच्या आत्महत्या

prashant_c

सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सोलापूर : कुर्डुवाडीतील के .एन. भिसे महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!