Tarun Bharat

भग्नप्रतिमा जमविण्याचा उपक्रम अव्याहत

प्रतिनिधी /बेळगाव

रस्त्याशेजारी, झाडाखाली, धार्मिक स्थळी टाकण्यात आलेल्या हिंदू देवदेवतांच्या भग्नप्रतिमा जमविण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. येथील सर्व लोकसेवा फाऊंडेशनने रविवारीही शहरातील विविध भागात हा उपक्रम राबविला.

आरटीओ सर्कलजवळील सोन्या मारुतीपासून हनुमाननगरपर्यंत व सांबरा रोडवरही देवदेवतांचे अपमान टाळण्यासाठी भग्नप्रतिमा जमविण्यात आल्या. सर्व लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ, श्रीकांत कदम, महादेव रेडेकर, संतोष हिरेमठ, देवाप्पा कांबळे, गुरुराज वाली, जितेंद्र शिंदे, मंजुनाथ, राहुल गावडे, विनायक परीट, बाळू कणबरकर आदींनी या उपक्रमात भाग घेतला. याबरोबरच देवदेवतांच्या प्रतिमा गलिच्छ ठिकाणी टाकू नयेत, यासाठी फलक उभारून जागृती करण्यात आली.

Related Stories

मनपा निवडणूकीसाठी परिवहन मंडळाच्या 23 बसची व्यवस्था

Amit Kulkarni

जिल्हय़ात 90 टक्के जनावरांना आधारकार्ड

Amit Kulkarni

गवाण फाटय़ानजीक कांद्याचा ट्रक उलटला

Patil_p

रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Omkar B

सेवेत कायम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Amit Kulkarni

आदर्श शिक्षिका उषा मोहिते यांचा सत्कार

Omkar B