वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग शहरातील उपद्रवी ठरलेल्या भटक्या गुरांवर कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे नगरपंचायत विरुद्ध येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सावंतवाडा येथील पांडुरंग उर्फ अभिजीत खांबल यांनी काल 1 ऑक्टोंबर रोजी हा दावा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग शहर परिसरात उपद्रव करणाऱ्या भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी श्री. खांबल यांनी 30 दिवसांच्या मुदतीची नोटीस वकिलांमार्फत दिली होती. परंतु अद्यापपर्यंत नगरपंचायतने या भटक्या गुरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे नगरपंचायत विरुद्ध दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) दोडामार्ग यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून नगरपंचायतला भटक्या गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्याचे आदेश होण्याची मागणी या दाव्याद्वारे करण्यात आल्याचे श्री खांबल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


previous post