Tarun Bharat

भरणेंना सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्याची चिन्हे

जिल्ह्यात दत्तामामांविरूद्ध वाढता रोष

प्रतिनिधी/सोलापूर

उजनी धरणातील पाणी पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना नेण्याचा प्रयत्न करणाऱया पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरूद्ध सोलापूर जिल्ह्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंदापूर भागात हिरो ठरलेल्या भरणे यांना सोलापूर जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यानी पालकमंत्र्यांना पाण्याबाबत जाब विचारला आहे. कडक भाषेत त्यांच्यावर टीका केली आहे. विविध शेतकरी संघटनांनी पालकमंत्र्यांना जिह्यात फिरू देणार नसल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद देऊन त्यांच्याकडे पालकमंत्री पद देण्याची मागणी केली आहे.

पालकमंत्री भरणेंनी कोरोना काळात सोलापूर जिह्याचा दौरा केला नाही. शहर आणि जिह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी काहीही केले नाही. सोलापूर जिह्याला आŸिक्सजन कमी पडला, रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णालये कमी पडली तरीही पालकमंत्री म्हणून भरणे काहीही करू शकले नाहीत. याबद्दलही सोलापूरकरांच्या मनात राग आहे. याआधी जितेंद्र आव्हाड त्यानंतर दिलीप वळसेपाटील आणि आता दत्तात्रय भरणे यांनाही सोलापूर जिह्याच्या पालकमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.

प्रणिती शिंदेंना पालकमंत्रीपद द्या ः भोसले

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नानासाहेब पटोले यांची निवड झाल्यामुळे सध्या विधानसभेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदावर काँग्रेसने सध्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास एक मंत्री पद रिक्त होते. त्यावर काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना संधी द्यावी आणि सोलापूरचे पालकमंत्री करावे. त्यामुळे सोलापूरचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. सोलापूरकरांची हीच अपेक्षा आहे. -विनोद धर्मा भोसले, नगरसेवक, सोलापूर महानगरपालिका.

Related Stories

सोलापुरात धाप लागून पती-पत्नीचा मृत्यू

Archana Banage

राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणात उस्मानाबाद जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

Archana Banage

सोलापूर : करमाळा तालुक्यात ३३८ ठिकाणी लावले ट्रॅप

Archana Banage

शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत स्वप्नांची राख; सहा एकर ऊस जळून लाखों रूपयांचे नुकसान

Abhijeet Khandekar

बार्शीतील कोरोना विलगीकरण कक्षात एकाची आत्महत्या

Archana Banage

शास्त्रीय संगीत, भक्तीगीतांनी सजली स्वरमयी संध्या

prashant_c