Tarun Bharat

भरमसाठ वीजबिलाविरोधात काँग्रेसची सोशलमीडिया चळवळ

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोरोनाचे संकट असतानाच गोवा सरकारने गोमंतकीयांना मदत करण्याऐवजी भरमसाठ रकमेची बीले देऊन मोठा आर्थिक बोजा टाकला आहे. वीजबिले तर कित्येक पटीनी वाढलेली आहेत. गोवा प्रदेश काँग्रेसने हा विषय सुरवातीपासून लावून धरला आहे. आता मंगळवारी या विषयावरून सोशल मिडीया चळवळ करण्यात येणार आहे. ‘स्पीक अप फॉर गोवा’ या मथळय़ाखाली ही एक दिवशीय चळवळ चालणार आहे. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.

वीजबीलांच्या वाढीव भरमसाठ रकमेने सामान्य माणूस प्रचंड दबला आहे. अशावेळी सरकारने लोकांना मदत करायला हवी. आता चतुर्थीजवळ आल्याने अगोदरच लोकासमोर आर्थिक संकट आहे. केंद्र सरकारकडून गोवा सरकारचा निधी मिळाला आहे. त्यामुळे सरकारने सामान्य लोकांना मदत करणे गरजेचे आहे. कर्ज घेऊन बीले भरण्याची पाठी लोकांवर आली आहे. त्यामुळे मंगळवारी ‘स्पीक अप फॉर गोवा अशी सोशल मिडीया चळवळ आयोजित केली आहे.

भरमसाठ बीलांच्या प्रकरणावर बोलण्याची संधी दिली जाणार आहे. ज्याना या बीलांमुळे त्रास झाला त्यानी एक किंवा दिड मिनिटांचा व्हीडीओ तयार करावा व सरकारकडे मागणी करावी की ही बीले माफ करावी. लोकानी नोकऱया गमावल्या आहेत. धंदा बुडाला आहे. अशावेळी सरकारने भरमसाठ बीले देऊन लोकाना अडचणीत आणले आहे. सरकारने केलेला अन्याय लोकांच्या माध्यमातून समोर आणणार आहे. आंधळय़ा बनलेल्या सरकारला जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे. या अगोदर काँग्रेसने तालुकावार आंदोलने केली. नंतर पणजीत वीज मुख्यालयासमोर आंदोलन करून मागण्या समोर ठेवल्या. चार पर्याय सरकार समोर ठेवले पण सरकार प्रतिसाद देत नसल्याने आता सोशल मिडीया चळवळ करणार आहे असेही ते म्हणाले.

Related Stories

बेटिंग टोळीस अटक

Amit Kulkarni

चंदगडच्या गंधर्वगड-केरवडे परिसरात वाघ

Rahul Gadkar

पिसुर्लेतील शेतकऱयांची 10 रोजी महत्त्वाची बैठक

Amit Kulkarni

गोव्यात फिजिओथेरेपी शिक्षण व उपचाराकडे वाढता कल

Patil_p

सामूहिक शेतीद्वारे पडिक जमिनीवर फुलला मळा

Omkar B

भूमिपुत्र अधिकारिणी विधेयकात दुरुस्ती करा

Amit Kulkarni