Tarun Bharat

भर कार्यक्रमात खासदाराने लगावली कुस्तीपटूच्या कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भर कार्यक्रमात एका नवोदित कुस्तीपटूच्या कानशिलात लगावली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या खासदारावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

रांचीमध्ये 15 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या कार्यक्रमात ब्रिजभूषण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान, या स्पर्धेत एका मुलाला अपात्र ठरवून स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळे या मुलानं स्टेजवर येत खासदार ब्रिजभूषण यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली. स्पर्धेत खेळू देण्याविषयी तो त्यांना विनवू लागला. मात्र, ब्रिजभूषण यांनी उठून संतापात या मुलाच्या कानशिलात लगावली. यावेळी स्टेजवरील मान्यवरांनी मध्यस्थी करत त्या मुलाची सुटका केली.

दरम्यान, खासदार ब्रिजभूषण आणि या मुलामध्ये स्टेजवर नेमकं काय बोलणं झालं, हे समजू शकले नाही. ब्रिजभूषण हे उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. याआधी गोंदा लोकसभा मतदारसंघातून देखील ते एकदा निवडून आले होते.

Related Stories

भाजप कार्यकारिणीची लवकरच घोषणा शक्य

Patil_p

भारतातील परिस्थिती भयानक! काही आठवडे लॉकडाऊन गरजेचे

Tousif Mujawar

मुख्यमंत्री, मंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत

datta jadhav

‘कल के लिए जल’

Patil_p

काका-पुतण्यांच्या पक्षांमध्ये होणार आघाडी

Patil_p

नॉट रिचेबलच्या चर्चांवर अजित पवारांचा खुलासा; म्हणाले…

datta jadhav
error: Content is protected !!