Tarun Bharat

भर पावसात बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन

मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सातारा कार्यालयालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माणिक अवघडे, आनंदी अवघडे, संतोष पैठणकर, संतोष नलावडे, विठ्ठल भोसले, संतोष घागरे, विवेक सुतार, प्रकाश नलावडे, रेखा कांबळे, आनंदराव कुंभार, शिवाजी कराडे, दशरथ बुधावले, दत्तात्रय सकट, पंकज उबाळे, पांडुरंग देशमुख उपस्थित होते.

 2019 पासून 2021 पर्यंतची रखडलेली नवीन नोंदणी फॉर्म त्वरित मंजूर करावी. विविध लाभाचे फार्म त्वरित मंजूर करा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांच्याशी चर्चा झाली. त्यात त्यांनी इंजिनिअर प्रमाणपत्रासह इतर त्रुटी दूर करून कामगारांची रखडलेली नवीन नोंदणी करू देण्याचे मान्य केले. यात गोपनीय पोलीस (गोपनीय) चे राहुल खाडे पोलीस विभागाची मदत झाली. व 2 वर्षे रखडलेली नोंदणीची मागणी मान्य झाल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Stories

अश्लील कॅफे चालकाला सातारकरांचा चोप

Patil_p

सातारा : रायरेश्वर युवा प्रतिष्ठान यांचा भव्य दीपोत्सव सोहळा

Archana Banage

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९९.६७ टक्के

Archana Banage

दिव्यांगांचा निधी खर्च करण्याची मागणी

datta jadhav

अजिंक्यतारा पुन्हा होरपळला….

Patil_p

औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Archana Banage