Tarun Bharat

भर पावसात होणारी खनिज मालाची वाहतूक पिसुर्ले गावातील नागरिकांनी रोखून धरली

Advertisements

वाळपई / प्रतिनिधी

सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले गावातून आज अचानकपणे खनिजमालाची वाहतूक सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला. सध्या पावसाळी मोसम सुरू असताना या खनिज वाहतुकीमुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल माखला असून यामुळे नागरिकांना अनेक करावा त्रास होत अआहे.. त्यामुळे हनुमंत परब व इतरांनी ही वाहतूक रोखून धरली.. यामुळे काही ट्रकवाल्यांनी पुन्हा माघारी फिरून भरलेला खनिज मङङ खाली करून पोबारा केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .

याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात भर पावसामध्ये खनिज वाहतुकीच्या प्रमाणाला सुरुवात झालेली आहे .यापूर्वी होंडा पंचायत क्षेत्रातील सोलये खाणीवरून  वाहतुकीला प्रारंभ करण्यात आला होता. सदर भागातील नागरिकांनी यासंदर्भात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून ही वाहतूक अडवून ठेवली होती .यामुळे सरकारच्या या मनमानी व सर्वसामान्यांना त्रास देण्याच्या प्रकल्पाविरोधात सत्तरी तालुक्मयात सध्यातरी   संताप व्यक्त करण्यात येत आहे .असे असतानाच आज पासून भर लोकवस्ती मधून खनिज मालाच्या वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केला व संताप  व्यक्त केला .सकाळी अचानकपणे वाहतूक सुरु झाली होती. यामुळे संतप्त नागरिकांनी वाहतूक मध्यवर्ती परिसरात रोखून धरली. यामुळे जवळपास 50 ट्रक रांगेत उभे होते .दोन तास रांगेत उभे राहिल्यानंतर काही ट्रक माघारी फिरून फोमेंतो खनिज खाणीवर भरलेला माल खाली केला व तेथून पोबारा केला.

तर काही ट्रक संध्याकाळी उशिरापर्यंत खनिज माल भरून त्या ठिकाणी उभे होते. यासंदर्भातील तक्रार स्थानिक जागृत कार्यकर्ते हनुमंत परब यांनी वाळपई पोलिस व सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकाऱयांना दिली. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत एकही अधिकारी सदर ठिकाणी  न पोचल्याचे हनुमंत परब यांनी स्पष्ट केले .यामुळे त्यांच्यावर राजकीय स्वरूपाचा दबाव असण्याची शक्मयता व्यक्त केली असून याभागातून अशा प्रकारची वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे .यासंदर्भात अधिक माहिती देताना हनुमंत परब यांनी सांगितले की गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भर पावसामध्ये खनिज मालाची वाहतूक सुरू आहे. हे खरोखरच मोठय़ा प्रकारच्या दुर्दैव आहे.. सध्या खनिज मालाची वाहतूक खरोखरच काढून ठेवलेल्या मालाची की नवीन उत्खनन करण्यात येत आहे अशा प्रकारचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे .

यासंदर्भात याचिका नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली असून सेसा गोवा व इतर खनिज खाणींमध्ये नवीन उत्पादन झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान आज सुरू करण्यात आलेली  मालाची वाहतूक यामुळे पिसुर्ले गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. यामुळे सर्वसामान्य व दुचाकी चालकांना सदर भागातून फिरणे अत्यंत मुश्कील होऊन बसले असून याची गंभीर दखल उपजिल्हाधिकारी घ्यावी व या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालावी अशा प्रकारची मागणी हनुमंत परब यांनी केली आहे .

दरम्यान काही नागरिकांनी या मालाची वाहतूक करणारे कॉन्ट्रक्ट दयानंद गावस यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचे स्पष्ट केले आहे .भर पावसामध्ये अशा प्रकारची वाहतूक करणे म्हणजे नागरिकांना मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण करण्याचा प्रकार असून ही वाहतूक बंद करण्याची मागणी नागरिकांनी सदर कॉन्टॅक्टर केली होती. मात्र त्यांनी याला कोणत्याही प्रकारची दाद न देता सरकारच्या यंत्रणेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला.

 त्यामुळे नागरिकांत तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे .अशा प्रकारची वाहतूक मंगळवारी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास या भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

विश्वजीत राणे याच्याकडून स्मार्टफोन

Patil_p

फोंडा नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास नोटीस

Amit Kulkarni

मडगाव श्री हरि मंदिराचा आषाढी एकादशी उत्सव

Amit Kulkarni

कोरोना बाधितांच्या सेवेसाठी वास्कोत नियंत्रण कक्षाची स्थापना

Patil_p

सांगेतून सावत्री कवळेकर यांची अपक्ष उमेदवारी दाखल

Patil_p

कोरोना : 403 बाधित, 16 बळी

Amit Kulkarni
error: Content is protected !!