Tarun Bharat

भवानीपूरसह तीन ठिकाणी ३० सप्टेंबरला मतदान; ममता बॅनर्जीही लढणार पोटनिवडणूक

Advertisements

पश्चिम बंगाल/प्रतिनिधी

पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक होंणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या निवडणूक लढवणार असलेल्या राज्यातील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ३० सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने शनिवारी केली. तसेच कोरोनामुळ‘पुढे ढकललेल्या’ पश्चिम बंगालमधील २ आणि ओडिशातील एक अशा तीन विधानसभा मतदारसंघांसाठीही याच दिवशी पोटनिवडणूक होणार आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली होती. पण भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचा पराभव केला होता. त्यांनतर त्यांनी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

पश्चिम बंगालमधील समशेरगंज व जांगीरपूर आणि ओडिशातील पिपली या मतदारसंघांतील निवडणुका या वर्षीच्या सुरुवातीला एका उमेदवाराच्या मृत्यूसह इतर कारणांमुळे होऊ शकल्या नव्हत्या. आता या पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

या सर्व मतदारसंघांतील मतमोजणी ३ ऑक्टोबरला होणार आहे. कोरोना महासाथीपासून बचावासाठी खबरदारी म्हणून निवडणूक आयोगाने या वेळी ‘अधिक कठोर’ निकष लागू केले आहेत. भवानीपूर पोटनिवडणुकीमुळे ममता बॅनर्जी यांना राज्य विधानसभेच्या सदस्य होण्याची संधी मिळू शकेल.

Related Stories

दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लता मंगेशकर यांच्याकडून 15 लाखांची मदत

prashant_c

मिताली राज ‘दस हजारी’ मनसबदार

Patil_p

कोरोना : जम्मू काश्मीरमध्ये 133 नवे रुग्ण; 419 जणांना डिस्चार्ज

Rohan_P

‘काँग्रेसला स्वबळावर लढायचंय तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?’

Abhijeet Shinde

राजस्थान : पूर्ण डिसेंबर महिन्यात ‘या’ जिल्ह्यांत असणार नाईट कर्फ्यू

Rohan_P

बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

datta jadhav
error: Content is protected !!