बुधवार दि.1 ते 7 सप्टेंबर 2021
येत्या 14 रोजी वक्र गतीने गुरुचा मकरेत प्रवेश
ग्रहमालेतील बलाढय़ व अत्यंत शुभ मानला गेलेला ग्रह म्हणजे गुरु. तो येत्या 14 तारखेपासून वक्र गतीने मकर राशीत येईल. ज्यावेळी प्रचंड शक्तीचे मोठे ग्रह वक्री होतात त्यावेळी जगात बऱयाच महत्त्वाच्या उलथा पालथी होतात. ‘न भूतो न भविष्यती’ अशा जागतिक घटना घडतात. शनि मंगळ यासारखे ग्रह वक्री झाल्यास त्याचे अत्यंत भयानक परिणाम असतात. पण गुरुसारखे शुभ ग्रह जर वक्री अवस्थेत असतील तर ते आपल्या अपेक्षेपेक्षापण चांगले कार्य करून जातात. जर एखाद्याची नोकरी गेलेली असेल, घरात जर कोणी हरवले किंवा परागंदा झालेले असतील तर ते परत येऊ शकतात. हरवलेल्या किमती वस्तु पुन्हा मिळू शकतात. घटस्फोटापर्यंत गेलेली प्रकरणे समेट होऊन पुन्हा संसार सुरळीत सुरू होतो. बंद पडलेला उद्योग व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ लागेल. लग्नासाठी नाकारलेले एखादे स्थळ माफी मागून परत येऊ शकते पण गुरु हा मुळातच शुभ असल्याने आपली बाजू मात्र सत्याची आणि शुद्ध पाहिजे तरच या वक्री गुरुचे चांगले अनुभव येतात अन्यथा त्याचे अत्यंत वाईट परिणामदेखील जाणवू शकतात. सर्वसाधारणपणे मकर राशीतील गुरु हा नीच मानला जातो. त्यामुळे त्याच्याकडून काही चांगले घडेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ असते, असे पूर्वीचे काही लोक म्हणत असत. पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. जे जे ग्रह नीच अवस्थेत असतात त्यांची दृष्टी त्यांच्या उच्च स्थानावर असल्याने त्या स्थानाचे अतिशय चांगले फळ मिळते असा सिद्धांत आहे. उदाहरणार्थ मिथुन राशीला मकरेचा गुरु आठवा येतो. तो अत्यंत अनिष्ट व मृत्यूप्रद समजतात. काही अंशी ते बरोबर असेलही पण त्याची दृष्टी मिथुनच्या धनस्थानावर पडत असल्याने या राशीला या वक्री गुरुच्या कालखंडात प्रचंड पैसाही मिळू शकतो. याचप्रमाणे इतर राशींचेही अनुभव पहावे. तुमची रास कोणतीही असो ज्या स्थानावर या गुरुची दृष्टी पडेल त्या स्थानाने दर्शविलेल्या तत्त्वावर त्याचा शुभ परिणाम झालेला दिसून येईल. गुरु कोणत्या नक्षत्रात आहे व त्याच्या पुढे 180 अंशावर कोणते नक्षत्र आहे ते कोणत्या स्थानी पडलेले आहे हे पाहून जर त्या प्रमाणे निरीक्षण केल्यास तुम्हाला जीवनात कोणत्या क्षेत्रात अथवा कोणत्या कामात यश मिळेल ते या गुरुमुळे समजेल जर या गुरुची सर्व राशीना शुभ फळे हवी असतील तर जास्तीत जास्त पावित्र्याने राहण्याचा प्रयत्न करा. सर्व प्रकारची व्यसने आणि मांसाहार यापासून दूर रहा. आपल्या हातून कुणाचेही चुकूनही वाईट होणार नाही याची काळजी घ्या तरच या गुरुची शुभ फळे निश्चित स्वरूपात मिळतील यावेळी दिलेले साप्ताहिक भविष्य मकर गुरुवर आधारित आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत त्याचा प्रभाव राहील.
मेष
दशम स्थानी वक्री गुरु आहे. कमी दर्जाची नोकरी मिळेल. विवाहाचे प्रयत्न यशस्वी होतील. जे काम हाती घ्याल ते निश्चित यशस्वी होईल. जागा, वाहन, घरदार, शेत जमीन खरेदी-विक्रीत अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. कुटुंबात सुख समाधान आणि समृद्धी राहिल. पण त्याचबरोबर काहीवेळा घाईगडबडीत चुकीचे निर्णयदेखील घेतले जातील. या गुरुच्या कालखंडात आपण बरे आपले काम बरे ही भावना ठेवा म्हणजे काही त्रास होणार नाही. मेजवान्या, पाटर्य़ा वगैरे देण्याच्या भरीस पडू नका. त्यातून काहीतरी गोंधळ होईल.
वृषभ
राजकीय क्षेत्रात असाल तर एखादे उच्च पद मिळू शकेल. मंत्री, आमदार खासदार होण्याचे योग. तुमच्या चांगल्या कृत्त्यावर परमेश्वराची कृपा राहील. तुमच्या सद्गुणांमुळे घरातील पूर्वजांना मुक्ती मिळेल. काहीवेळा नास्तिकतेकडे मन वळेल. काही वेळा एखादे काम होण्यासाठी एकटय़ालाच प्रयत्न करावे लागतील. मदतीचे आश्वासन देणारी मंडळी ऐनवेळी काहीतरी घोटाळा करतील. नोव्हेंबरपर्यंत या गुरुचा प्रभाव राहील.
मिथुन
अष्टम शनि वक्री गुरु आरोग्याच्या बाबतीत चांगला नसतो, पण कोणतेही गंभीर प्रसंग आले तरी त्यातून तो निश्चितच सुटका करील. वडीलधारी मंडळीशी चुकूनही मतभेद होऊ देऊ नका. तुमचे वय जर 8, 20, 32, 44, 56 असेल तर तुम्ही सर्व काळजी घेणे आवश्यक आहे. पण गुरुची पूर्ण दृष्टी धनस्थानावर असल्यामुळे 20 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला मोठय़ा प्रमाणात सतत पैसा मिळत जाईल. त्यामुळे जीवनातील बऱयाच महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.
कर्क
सप्तमात येणारा गुरु तुमच्या वैवाहिक जीवनावर बराच प्रभाव पाडेल. सरकार दरबारी मानसन्मान मिळेल. एखादे पद किंवा प्रति÷ा मिळण्याची शक्मयता दिसते. sएखादा कारखाना वगैरे सुरू करण्यास अनुकूल काळ. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या काही चांगल्या कामामुळे आई-वडील, आजोबा अथवा घराणे यांचा नावलौकिक होईल. स्वतःची बुद्धिमत्ता आणि काही नेत्यांच्या सहकार्याने जीवनात वर येण्याचा प्रयत्न कराल. घरदार आणि मालमत्ता होण्यासाठी प्रयत्न करा. यशस्वी व्हाल. कुणाची काही कारस्थाने असतील तर ती त्वरित उघडकीस येतील.
सिंह.
गुरु मृत्यूषडाष्टकात येत आहे. कोणत्याही अवघड शिक्षणात उत्तम यश मिळेल. बोलण्यातील काही चुकांमुळे निष्कारण शत्रुत्व निर्माण होईल. कोणत्याही मोठय़ा संकटात मित्रमंडळींचे गुप्त सहकार्य मिळत राहील. धर्मार्थ कार्यासाठी बराच खर्च करावा लागेल. आर्थिक बाबतीत जपून राहावे लागेल. काही चुकांमुळे धनप्राप्तीचे मार्ग बंद होऊ शकतात. वारंवार नोकरी, व्यवसाय बदलण्याची इच्छा होईल पण तसे चुकूनही करू नका.
कन्या
पंचमात वक्री गुरु येत आहे. भावंडांशी मिळून-मिसळून राहिलात तर सर्व क्षेत्रात प्रगती होईल. या कालखंडात संतती झाल्यास तुमचे भाग्य उजळेल. कोणत्याही कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही. कोणत्याही सरकारी क्षेत्रात नोकरीसाठी प्रयत्न केला असेल तर यशस्वी व्हाल जर कुणाला उधार उसनवार थकून दिल्यास ते परत मिळेल. त्यांना फार त्रास होईल या बाबतीत आपण सावध राहावे.
तूळ
सरकारी नोकरी मिळण्याचे योग मानसिक सुख समाधान राहील जे काम सुद्धा कराल त्यातच भाग्योदय होईल सोने चांदी खरेदी अथवा त्यांच्या व्यवसाय केल्यास त्याचा मोठा फायदा होईल पण लोखंडाशी संबंधित खरेदी-विक्री मात्र नुकसानदायक ठरू शकेल मुलाबाळांच्या बाबतीत जरा त्रास होण्याची शक्मयता आहे पूर्वीच्या कळत नकळत घडलेल्या घोटाळय़ामुळे जन्मगाव पासून दूर राहावे लागेल घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका चुकू शकतील व त्याचां परिणाम गंभीर असेल
वृश्चिक.
पराक्रमात येणाऱया गुरूच शुभ दृष्टी भाग्यस्थानवर आहे सोने-चांदी रत्ना सह वस्तू खरेदी कराल अचानक कुठून तरी मोठा धनलाभ होण्याची शक्मयता तीर्थयात्रेला जाण्याचे योग ज्योतिष मंत्र तंत्र व तत्सम गुड विद्या शिकण्याची संधी मिळेल राजकीय पदाधिकारी असाल तर तुमचे महत्त्व वाढेल अपेक्षा केलेली नसेल इतके प्रचंड यश मिळेल आर्थिक सुबत्ता वडीलफोन आप्तस्वकीय व नातेवाईक मंडळी यांच्या कडून काही बाबतीत त्रास होण्याची शक्मयता दिसते.
धनु.
धनस्थानी गुरु चे आगमन काही बाबतीत अतिशय उत्तम आहे आर्थिक स्थिती सुधारेल कोणत्याही क्षेत्रात असाल तरी त्यातून सतत धनलाभ होत राहतील जिवावरच्या संकटातून मुक्त व्हाल जागा वाहन घरदार तसेच इतर काही महत्त्वाची कामे अडळी. असतील तर ती पूर्ण होतील सासरच्या घराण्याकडून काहीतरी मोठा लाभ होईल जर एखाद्यावर कोणतीही गंभीर संकट आले असेल तर तुमच्या प्रयत्नांमुळे त्याचा बचाव होईल.
मकर
तुमच्या राशीतच आलेला गुरु मानसिक समाधान देईल आतापर्यंत न् झालेली कामे सहज हातावेगळी होतील विवाहासह इतर सर्व दृष्टीने शुभ घटना घडती ल ऊतकर्षास सुरुवात होईल बँका विमा पत्रकरता उद्योगपती कारखानदारी यांच्याशी संबंध असेल तर निश्चित भाग्य उजळणारआहे कोणत्याही संकटाच्या वेळी निश्चित दैवी सहाय्य मिळेल आत्मकि शक्ती वाढल्याने कोणतेही काम अवघड व कठीण वाटणार नाही.
कुंभ
साडेसाती सुरू आहे त्यातच बारावा गुरु आलेल आहे मामा भाचे व इतर नातेवाईक तुमच्या आर्थिक व कौटुंबिक जीवनात हस्तक्षेप करतील त्यांच्या सल्ल्याने काही कामे करावी लागतील वडिलोपार्जित व्यवसाय असेल तर त्यात चांगली प्रगती झालेली दिसून येईल गुप्त शत्रूंचा कारवायांमुळे मानसिक शांती ढळण्याची शक्मयता आहे कुणाच्याही सांगण्यावरून हाती घेतलेले काम स्थगित करू नका नोकरीच्या प्रयत्नात असाल तर इतर क्षेत्रात यश मिळेल.
मीन
लाभस्थानी गुरू आणि त्याची पंचम स्थानावरील शुभ दृष्टी अतिशय चांगल्ला योग आहे संतती प्राप्ती विवाह योग भाग्योदय मित्रमंडळीचे सहकार्य थोरामोठय़ांचा सल्ला तसेच लक्ष्मीची कृपा यादृष्टीने उत्तम अनुभव येतील जे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल पण घाईगडबड अथवा चंचलपणा मात्र सोडावा लागेल अन्यथा मोठे यश देखील हुलकावणी देईल व्यवसाय वा शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल राहती वास्तू अथवा मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार कराल.