Tarun Bharat

भविष्य

गुरुविण कोण दाखवील वाट (अंतिम भाग)

पराशक्तीला, गुरुजनांना आणि वाचकांना सादर सविनय नमस्कार. मागच्या भागात आपण मेष ते कन्या या राशींवर गुरु राशी बदलाचा काय परिणाम होईल हे पाहिले. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ गुरु नाही तर सगळय़ा 12 ग्रहांचा (हर्षल, नेपच्यून, प्लुटो धरून) आणि मांदी सारख्या उपग्रहांचाही परिणाम होत असतो. राशींवर परिणाम हा साधारण ढोबळ असतो. मूळ पत्रिका अभ्यासून अचूक भाकित केले जाऊ शकते. आता तूळ ते मीन राशींवर काय परिणाम होतो ते पाहूया.

तुळ ः आर्थिक बाजू भक्कम होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. नव्या नात्याची सुरुवात होईल. संततीच्या बाबतीत उत्तम. नोकरीत बदल हवा असेल तर योग्य काळ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. स्थान बदल होऊ शकतो.

वृश्चिकः खर्च वाढणार आहेत. त्यामुळे पैशाची आवक कशी जास्त होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अचानक धनलाभांचे योगही बरे आहेत. वैवाहिक आयुष्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. एखादा आजार गंभीर रुप धारण करण्याआधी टळून जाईल.

धनुः भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे. उच्च शिक्षण, धार्मिक प्रवास होण्याचे योग आहेत. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. भागीदारीत व्यवसाय असेल तर उत्तम दिवस आहेत. मित्रपरिवार, मोठय़ा भाऊ/बहिणीची साथ मिळेल. लाभ होतील.

मकरः नोकरदारांसाठी हे गुरु संक्रमण शुभ आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कर्ज मंजूर होईल. सासरकडच्या लोकांना धनलाभ, व्यवसायात वाढ, कौटुंबिक सुखाच्या दृष्टीनेसुद्धा हा काळ अनुकूल आहे.

कुंभः आरोग्याच्या दृष्टीने उत्तम काळ. जी जोडपी संततीकरता प्रयत्न करत आहेत त्यांना योग चांगला आहे. व्यवसायात वाढ होईल. प्रवासाचे योग आहेत. दांपत्यजीवन सुखमय होईल. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा.

मीनः नवीन वास्तू किंवा वाहनाचा योग आहे. नोकरीकरता प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक दृष्टीने हा काळ सावध राहण्याचा आहे.

पुढच्या आठवडय़ात एका फार महत्त्वाच्या आणि आजूबाजूला घडणाऱया प्रकाराबद्दल बोलणार आहे.

 आपला आठवडा आनंदी जावो, जो जे वांछील तो ते लाभो

महाउपायः आजकाल पितृदोषाचा बाऊ केला जातो. महागडे उपाय किंवा शांती सांगितल्या जातात. सगळय़ांना ते परवडेल असे नाही. त्यासाठी एक सोपा पण महाउपाय. शनिवारी पिंपळाला दूधमिश्रीत पाणी घालून 7 प्रदक्षिणा घालाव्यात ‘पितृदेवाय नमः’ हा मंत्र 4 वेळा म्हणावा.

सोपी वास्तू टीपः पती पत्नीमध्ये वाद होत असल्यास बेडरुममध्ये एक मोरपीस आणि बासरी (वेळूची) एकत्र बांधावी.

मेष

मित्रांच्या सहवासाने मन प्रफुल्लित राहील. स्वपराक्रमाने आणि जिद्दीने यश मिळेल. मनावर आलेली निराशा झटकून काम करा. लाभाचे योग आहेत. सहलीचा बेत आखाल. प्रकृती मात्र सांभाळा. नोकरदारांना आठवडा चांगला जाईल. मंगल कार्यावर खर्च होईल.

उपाय/उपासनाः केशराचा टिळा लावा.

सावध रहाः गुरुवार

शुभ अंकः 3, शुभ रंगः पिवळा.

वृषभ

प्रवासाचा उत्तम योग आहे. उच्च शिक्षणासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. व्यवसायात लक्ष जास्त द्यावे लागेल. एखादी व्यक्ती फसवू शकते. तुमचा बेधडक स्वभाव अडचणींवर मात करेल. अनावश्यक खर्च टाळा.

उपाय/उपासनाः गरजूला औषधांचे दान करा.

सावध रहाः बुधवार, गुरुवार

शुभ अंकः 5, शुभ रंगः हलका हिरवा

मिथुन

तुमची बुद्धिमत्ता हे तुमचे साधन आहे. पण चंचल वृत्ती टाळा. आठवडा संमिश्र आहे. सुरुवातीला मानसिक तणाव राहील. पण नंतर मन कामात गुंतेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. लेखी व्यवहार पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होईल.

उपाय/उपासनाः गुरुवारी श्रीदत्त मंदिरात केळय़ांचा नैवेद्य दाखवा.

सावध रहाः रविवार

शुभ अंकः 3, शुभरंगः हलका नारंगी

कर्क

जलद कृती करणे हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीवर मात कराल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. लाभाच्या संधींचे चीज कराल. सोमवार, मंगळवार एखादी चिंता सतावेल. प्रकृती उत्तम राहील. धनप्राप्तीचे दिवस.

उपाय/उपासनाः सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा.

सावध रहाः गुरुवार

शुभ अंकः 7, शुभ रंगः क्रीम.

सिंह

वैवाहिक सुखाच्या दृष्टीने सुंदर आठवडा आहे. लग्नाकरिता प्रयत्न करत असाल तर अपेक्षित बातमी कळेल. तापट स्वभावाला आवर घाला. राग आलेला असताना अपशब्द वापरू नका. स्थावर संपत्तीचा योग आहे. वाहन जपून चालवा.

उपाय/उपासनाः बुधवारी बजरंग बाण स्तोत्राचे 11 पाठ करा.

सावध रहाः सोमवार

शुभ अंकः 5, शुभ रंगः हलका हिरवा.

कन्या

बुधवार, गुरुवारी आरोग्याची चिंता सतावेल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. नोकरीची चिंता मिटेल. जीवनसाथीचे सहकार्य लाभेल. जमीन/वाहन या बाबतीत कोणताही व्यवहार सध्या नको. मेहनतीचे चीज होईल.

उपाय/उपासनाः गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून आंघोळ करा.

सावध रहाः बुधवार

शुभ अंकः 3, शुभ रंगः पिवळा

तुळ

प्रकृतीचा पाया थोडा डळमळतो आहे. करमणुकीकडे कल वाढेल. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. लिखित व्यवहार करताना सावध रहा. गुप्त शत्रू, प्रबळ होत आहेत. कामे वेळेवर पूर्ण कशी होतील याकडे लक्ष द्यावे लागेल. लाभाच्या संधी येत आहेत. गाफिल राहू नका.

उपाय/उपासनाः आईची सेवा करा, गरजूला अन्नदान करा.

सावध रहाः गुरुवार

शुभ अंकः 2, शुभ रंगः पांढरा.

वृश्चिक

कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घराकरता नवीन वस्तू घ्याल. कामाचे कौतुक होईल. तब्येत सुधारेल. संततीसंबंधी शुभ वार्ता कळेल. जोडीदाराशी मतभेद होऊ देऊ नका. प्रवासाचा योग आहे. व्यावसायिक प्रगती होईल.

उपाय/उपासनाः बुधवारी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा.

सावध रहाः शुक्रवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः तपकिरी

धनु

कलागुणांना वाव मिळेल. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्या. धाडसी निर्णय घेणे टाळा. वाहन सौख्य उत्तम. जीवनसाथीबरोबर वाद होण्याची शक्मयता आहे. भाग्याची उत्तम साथ आहे. कष्ट कमी पडू देऊ नका.

उपाय/उपासनाः नोकरी/व्यवसायात प्रगतीसाठी शुक्रवारी कन्या पूजन करा.

सावध रहाः बुधवार

शुभ अंकः 6, शुभ रंगः शुभ्र पांढरा

मकर

जुनाट आजारात आराम मिळेल. पैशाची आवक उत्तम राहील. खाण्यापिण्यावर पैसे खर्च होतील. नोकरदारांसाठी हा आठवडा प्रगतीचा. जोडीदाराचे सहाय्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. लाभाच्या दृष्टीने आठवडा उत्तम आहे.

उपाय/उपासनाः आईच्या हातून थोडे तांदूळ घेऊन पांढऱया रुमालात बांधून जवळ ठेवा.

सावध रहाः रविवार

शुभ अंकः 3, शुभ रंगः मरुन

कुंभ

व्यवसाय/नोकरीसाठी हा आठवडा लाभदायक आहे. जुनी येणी वसूल होतील. नव्या योजना आखाल. कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. खर्च जास्त होईल. मित्र मैत्रिणींचे सहकार्य मिळेल. गुप्त शत्रूंच्या कारस्थानापासून सावध रहा.

उपाय/उपासनाः रविवारी गरजू व्यक्तीला गहू दान करा.

सावध रहाः शनिवार

शुभ अंकः 1, शुभ रंगः लाल.

मीन

खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. जुने मित्र भेटतील. तब्येत व्यवस्थित असेल. तुमच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ लावला जाणार नाही याची काळजी घ्या. मनोरंजनाकडे कल वाढेल. वैवाहिक सौख्य उत्तम.

उपाय/उपासनाः भटक्मया कुत्र्यांना तेल लावलेली चपाती घाला

सावध रहाः गुरुवार,

शुभ अंकः 7, शुभ रंगः आस्मानी

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 जून 2020

Patil_p

राशी भविष्य

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 एप्रिल 2020

Patil_p

राशींचा देश-टॅरोचा संदेश

Patil_p