Tarun Bharat

भांगराळे गोंयच्या उत्सवी नाटय़ स्पर्धेत ‘आगळे त, वेगळे हाव’ नाटक प्रथम

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

भांगराळें गोय अस्मिताय संस्था आयोजित श्रीमती सुमती रामा नाईक स्मृती दुसर्‍या उत्सवी कोंकणी नाटय़ स्पर्धेत तीन मानस मोयरा येथील राष्ट्रोळी माहला संघाच्या ‘आगळें तt वेगळे हांव’ या नाटकाला प्रथम बक्षीस प्राप्त झाले. स्पर्धेतील दुसरे बक्षीस मोसार्डे येथील महादेव माfहला नाटय़ मंडळाच्या ‘आनंद मती’ या नाटकाला तर तिसरे बक्षीस सात्रे येथील श्री सातेरी केळबाय ब्राह्मणी मायाच्या ‘दम दमा दम’ या नाटकाला प्राप्त झाले.  हा बक्षीस वितरण सोहळा रविवारी वेणा& जुने म्हार्दोळ येथील महालसा नारायणी संस्थानच्या हॉलमध्ये पार पडला.

बक्षीस वितरण सोहळय़ाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द नाटककार श्रीधर कामत बांबोळकर तसेच स्मार्ट लिंक कंपनीचे मालक व वेणा&तील म्हाळसा नारायणी संस्थानचे अध्यक्ष कमलाक्ष नाईक यांची खास उपस्थिती होती. प्रसिद्ध साहिlयीक पुंडलीक नाईक, भांगराळे गोंय चे अध्यक्ष राजेश प्रभू व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या नाटय़ स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

उत्तेजनार्थ बक्षिसे मासुर्डे वाळपई येथील शांतादुर्गा नाटय़ मंडळाच्या ‘आंकवार कंपनी’ व आल्त पर्वरी येथील श्री रामवडेवर संस्थानच्या ‘आगळे तt वेगळे हांव’ यांना देण्यात आली.

पुरूष अभिनय – प्रथम – मयुरेश गांवकर (शामरू- दम दमा दम), द्वितीय – प्रथमेश गवस (जगदीश : आंकवार कंपनी), प्रशस्तीपत्रक – नारायण नाडकर्णी (कनैया – जांवय खोशी मांय घालता धोशी), राजेश गवस (पांगम – दम दमा दम),

माfहला अभिनय : प्रथम – प्रतीक्षा प्रमोद शिरोडकर (कोमल- आगळे तt वेगळे हां मोयरा), द्वितीय – रविना रविराज शेट (कल्पना – आगळे त वेगळे हांव, पर्वरी). प्रशस्तीपत्रक – स्नेहा दयानंद केरकर (आई – आगळे तt वेगळे हांव), कोहिरा सुनील चोडणकर (कल्पना – आगळे तt वेगळे हांव), उत्कृष्ठ विनोदी भूमीका – विठोबा (सलील) गवस ( जय- आंकवार कंपनी). उत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पाfहले बक्षीस समीर शाबो गडेकर (आगळे तt  वेगळे हांव- राष्ट्रोळी माfहला संघ, तीन मानस मोयरा), द्वितीय बक्षीस विनय विष्णू गांवस (महादेव माfहला नाटय़ मंडळ मोसार्डे – आनंद मती) यांना प्रप्त झाले.

उत्कृष्ठ प्रकाश योजना – उमेश करबटकर (आनंद मती), पावसंगीत – सुशांत साळगांवकर (आगळे त वेगळे हांव’ मयडे), नेपथ्य – कुंदन च्यारी (आनंद मती), आयोजक गाव म्हणून श्री सातेरी केळबाय ब्राह्मणी माया साट्रे वाळपई यांना बक्षीस प्राप्त झाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामदेव शेट, प्रसाद पागी व सुरज कोमरपंत यांनी काम पाहिले. नाटय़ स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून पंकज नमशीकर, संयोजक सुरज कोमरपंत यांनी काम पाfहले.

Related Stories

येणाऱया निवडणूकांमध्ये भाजपला बहुमताने विजयी करणे हेच ध्येय

Patil_p

सांताक्रूझ येथे गोळी लागून युवकाचा मृत्यू

Patil_p

डिचोलीत कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

कंत्राटी कामगारांची सरकारी सेवेत पूर्ण वेळ घेण्याची मंत्री मायकल लोबोकडे मागणी

Patil_p

तेरेखोल येथे हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाची पायाभरणी

Amit Kulkarni

खासगी वनक्षेत्र प्रकरणात सरकारने तातडीने लक्ष घालावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!