Tarun Bharat

भांबेडमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणाची होणार चौकशी

Advertisements

प्रतिनिधी / लांजा

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या भांबेड येथील संजय लांबोरे या तरूणाच्या मृत्यू प्रकरणी बुधवारी आमदार राजन साळवी यांनी भेट देऊन हलगर्जी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आता यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

आमदार राजन साळवी यांनी लांबोरे कुटुंबियाची भेट देऊन सांत्वन केले. भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्राला ही भेट देऊन येथील वैद्यकीय अधिकारी आणि लांजा ग्रामीण रुग्णालय यांनी संजय लांबोरे मृत्यू प्रकरणाची माहिती घेऊन यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश आमदार राजन साळवी यांनी दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर उपस्थित होते. तातडीने सर्पदंश लस लांजा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्याबाबत शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा केली.

लांजा विभागामधील भांबेड प्राथमिक केंद्र व लांजा ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी सर्पदंश यावर उपयुक्त पडणारे औषध उपलब्ध नसल्याने 29 ऑक्टोबर 2020 रोजी भातकापणी करत असताना सर्पदंश झालेल्या 35 वर्षीय संजय लांबोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लांजा ग्रामीण रुग्णालय यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.

संजय लांबोरे याला सर्पदंश झाल्यावर उपचार करण्यासाठी 10 तासांचा अवधी लागला होता. लांजा ग्रामीण रुग्णालय व भांबेड आरोग्य केंद्राने कोणतेही उपचार केले नसल्याचे पुढे आले आहे. रुग्णवाहिका मिळण्यासही अवधी झाला होता. रत्नागिरीत गेल्यानंतर संजय याची प्राणज्योत मावळली होती. या प्रकरणी लांजा तालुका वैद्यकीय अधिकारी मारुती कोरे यांना याचा जाब विचारण्यात आला.

Related Stories

राजापुरातील टंचाई आराखडय़ातील 9 नळपाणी योजनांच्या कामाला ब्रेक

Patil_p

नद्यांना पूर, महामार्ग ठप्प !

Patil_p

आलिमवाडीतील पाणीटाकी जागेबाबत राष्ट्रवादीचा आक्षेप

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत मच्छिमारांचे साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

Abhijeet Shinde

भाविका झोरे मृत्यू प्रकरणी आमदार निकमांचे गृहमंत्र्यांना पत्र

Patil_p

चिपळुणात राणेंच्या जनआर्शीवाद यात्रेत शिवसेना, भाजपामध्ये राडा

NIKHIL_N
error: Content is protected !!