Tarun Bharat

भाऊराव काकतकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव

विद्यार्थ्यांना उद्योग जगतात नोकरी मिळणे सोपे व्हावे, यासाठी बेळगाव येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात बजाज फायनान्स कंपनीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी बँकिंग, फायनान्स आणि विमा विषयाचा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कोर्समध्ये 55 मुलांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकीतून बजाज फायनान्स कंपनीने आपल्या अनुभवी अधिकाऱयांच्या व तज्ञांच्या सहकार्याने हा कोर्स आयोजित केला होता. कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी कंपनी व महाविद्यालयामध्ये समंजस करार झाला. यावेळी कंपनी उपव्यवस्थापक पल्लवी गांधीलीकर या ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होत्या. कंपनीचे सदस्य अमित याळगी व सरस्वती पेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भविष्यात बाजारपेठेच्या अवकाशात उडण्यासाठी हा कोर्स विद्यार्थ्यांच्या पंखांना निश्चित बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. आभार प्रदर्शन प्रा. दिलीप वाडेकर यांनी केले. यावेळी अमित सुब्रम्हण्यम् उपस्थित होते.

Related Stories

मायदेशात अभाव म्हणून परदेशी धाव!

Amit Kulkarni

आम्ही छत्रपती शिवरायांचे वारस, विसरू नका !

Archana Banage

भांबार्डा येथील कलमेश्वर मंदिराचा कॉलमभरणी कार्यक्रम उत्साहात

Amit Kulkarni

कर्नाटक पाऊस: तातडीच्या मदतकार्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० कोटींची मदत जाहीर

Archana Banage

निर्मला कळ्ळीमनी यांचा निबंध स्पर्धेत व्दितीय क्रमांक

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात आणखी सात जणांना बाधा

Patil_p