Tarun Bharat

भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी

गोशाळेच्या कामाला प्रारंभ : हुक्केरीत 200 जनावरांची क्षमता असणारी गोशाळा उभारणार

प्रतिनिधी /बेळगाव

दूध क्षमता संपलेल्या जनावरांसाठी पशुसंगोपन खात्यामार्फत गोशाळा उभारली जात आहे. या गोशाळेचा भूमीपूजन कार्यक्रम नुकताच झाला. पशुपालकांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी पशुसंगोपन खात्याने गोशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दूध क्षमता संपलेल्या आणि भाकड काळातील जनावरांना या गोशाळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे आता भाकड काळातील जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात गोशाळा उभारल्या जाणार आहेत. बेळगाव जिल्हय़ात हुक्केरी तालुक्मयात 200 जनावरांची क्षमता असणारी गोशाळा उभारली जाणार आहे. याकरिता भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून निधीदेखील उपलब्ध झाला आहे. या गोशाळेत भाकड काळातील जनावरांबरोबर व्याधी झालेल्या जनावरांनादेखील प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय त्यांच्यावर उपचार करून पालनपोषण केले जाणार आहे.

या गोशाळेत महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यांच्या धर्तीवर विकास साधला जाणार आहे. जनावरांच्या दुधापासून दुधाचे उपपदार्थ बनविणे, गो आधारीत शेती करणे, सेंद्रिय खत, बायोगॅससारखे प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यामुळे गोशाळेतून खात्याला उत्पन्नही प्राप्त होणार आहे.

राज्यात गोवंशीय प्राण्यांच्या वाहतुकीवर आणि कत्तलीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तरीदेखील चोरून प्राण्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली जाते. मात्र गोशाळा उभारल्यानंतर अशा प्रकारांना आळा बसणार आहे. हुक्केरी तालुक्मयातील 19.40 एकर गुंठय़ात ही गोशाळा उभारली जाणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील अनेक जनावरांच्या देखभालीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

बेळगाव जिल्हय़ात मोठी गोशाळा उभारली जाणार

इतर जिल्हय़ांच्या तुलनेत बेळगाव जिल्हय़ात मोठी गोशाळा उभारली जाणार आहे.  गोशाळेत दाखल होणाऱया आजारी जनावरांवर उपचार केले जाणार आहेत. तसेच गोशाळेत एक पशुवैद्यकीय डॉक्टर कायमस्वरुपी सेवा देणार आहे. त्यामुळे दूध क्षमता संपलेल्या भाकड काळातील जनावरांना संरक्षण मिळणार आहे.

ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)

Related Stories

सत्ती निवासी संकुल लवकरच दुरुस्त करणार

Amit Kulkarni

परतीच्या पावसाने पुन्हा शहरासह उपनगराला झोडपले

Rohit Salunke

बससेवा ठप्प झाल्याने चंदगडवासियांचे हाल

Amit Kulkarni

मॅन्युअल स्कॅव्हेंजरअंतर्गत स्वच्छता कामगारांना प्रशिक्षण

Amit Kulkarni

इंधन-रिक्षा खरेदीच्या दरात तिपटीने वाढ

Patil_p

कंग्राळ गल्ली येथे आरोग्य तपासणी शिबिर

Amit Kulkarni