Tarun Bharat

भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धेत प्रणिता फराकटे प्रथम

वेशभूषा स्पर्धेत प्रतिक्षा शियेकरांना अव्वल क्रमांक; भागिरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजन

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

भागिरथी महिला संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत पुलाची शिरोलीतील प्रणिता फराकटे यांनी प्रथम क्रमांक संपादन केला. महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धेत प्रतिक्षा शियेकर यांना अव्वल क्रमांक मिळविला.

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रणित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मंगळवारी भागीरथी होम मिनिस्टर स्पर्धा झाली. सौ. अरूंधती महाडिक यांनी संस्थेविषयी आणि या उपक्रमाविषयी माहिती दिली. कौटुंबीक जबाबदारीच्या बरोबरीने अनेक महिला नोकरी-व्यवसायात मग्नग्न असतात. रोजच्या कामाच्या रहाट गाडग्यातून थोडी मुक्ती मिळावी आणि विरंगुळा मिळावा, यासाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, पण त्याचवेळी स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.अनुष्का वाईकर, वैशाली भोसले उपस्थित होत्या. तसेच स्मिता माने, उमा इंगळे, सिमा कदम, संगीता खाडे, ग्रिष्मा महाडिक, धनश्री तोडकर यांच्यासह महिलांची मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती होती. माजी खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, सत्यजीत कदम, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.

स्पर्धेचा निकाल असा ः
भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धा ः प्रथम क्रमांक – प्रणिता फराकटे (पुलाची शिरोली), व्दितीय क्रमांक – माधवी दळवी, तृतीय क्रमांक -सरिता हारुगले. विजेत्यांना पैठणी देण्यात आली.

महाराष्ट्रीयन वेशभुषा स्पर्धा ः प्रथम क्रमांक – प्रतिक्षा शियेकर, द्वितीय क्रमांक- तेजस्विनी तरके, तृतीय क्रमांक – अश्विनी वास्कर. उत्तेजनार्थ बक्षीस- कल्याणी जाधव, निमा गडदे, आशा खराडे, गीता कातवे, नीलम बनछोडे, शुभदा पाटील आणि श्वेता भोसले.
स्पर्धेत परिक्षक म्हणून मनिषा रानमाळे यांनी काम पाहिलं.

Related Stories

खुल्या, ओबीसींवर अन्याय करणारा निर्णय मागे घ्या

Abhijeet Shinde

हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत गदारोळ

Patil_p

तोतया पोलिसांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त

Abhijeet Shinde

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीचे शुल्क रद्द करावे – आ. जयंत आसगांवकर

Sumit Tambekar

जिल्हा बँक निवडणूक निकाल: निवडून आलेले उमेदवार असे…

Abhijeet Shinde

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!