Tarun Bharat

’बागी 3’ ने केले रंगांची उधळण !

Advertisements

टायगर श्रॉफ-श्रद्धा कपूर जोडीच्या ‘बागी 3’ने बॉक्स ऑफिसवर यशाचा गुलाल उधळला आहे. ‘तान्हाजी ः द अनसंग वॉरियर’नंतर बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा धमाका झाला नव्हता. पण ‘बागी 3’ ने काहीशा उदासिन वातावरणात आनंदाचे रंग भरल्याचं दिसून येत आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ने नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बॉलिवूडच्या आकाशात  नवे रंग भरले. चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर बॉक्स ऑफिसवर फार मोठा धमाका झाला नव्हता. काही चित्रपटांना यश मिळालं पण ते मर्यादितच राहिलं. म्हणूनच बॉलिवूडला एखाद्या रंगारंग कामगिरीची ओढ लागून राहिली होती. ‘बागी 3’ ने बॉलिवूडची ही अपेक्षा पूर्ण केल्याचं दिसून येत आहे. ‘बागी 3’ ने हिंदी बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रंगांची उधळण केली आहे आणि या रंगांमध्ये अवघं बॉलिवूड न्हाऊन निघालं आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘बागी 3’ ने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’लाही मागे टाकल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 17.5 ते 18.5 कोटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. ‘तान्हाजी’ने पहिल्या दिवशी 15.10 कोटी रुपये कमावले होते. ‘बागी 3’ ला समिक्षकांकडून संमिश्र प्र्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनाआधीच ‘बागी 3’ची बरीच प्रसिद्धी करण्यात आली होती. या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. ‘वॉर’ नंतर टायगर श्रॉफने ‘बागी 3’मध्ये जबरदस्त ऍक्शन केली आहे. त्यामुळे चाहत्यांनाही टायगरचा डॅशिंग अवतार बघायचा होता. याच कारणामुळे बर्याच प्रेक्षकांनी ‘बागी 3’ला पसंती दिली असावी. हा चित्रपट तब्बल 4400 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. हा टायगर श्रॉफचा सर्वाधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होणारा चित्रपट ठरला आहे. ‘बागी 3’ने या आघाडीवर ‘वॉर’सह अक्षयकुमारचा ‘हाऊसफुल 4’, सलमान खानचा ‘दबंग 3’ सारख्या चित्रपटांना मागे टाकलं. एकंदरीत, ‘बागी 3’ मुळे बॉक्स ऑफिसवरचं वातावरण पुन्हा एकदा रंगीबेरंगी झालं. तिकडे  आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ने 58.94 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने आठवडय़ाभरात 44.84 कोटी रुपये कमावले होते. तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ने बॉक्स ऑफिसवर छाप पाडली. या चित्रपटाने आठवडय़ाभरात 22.79 कोटी रुपये कमावले. हा चित्रपट 30 कोटी रुपयांच्या आसपास कमाई करेल, अशी ट्रेडगुरूंची अपेक्षा आहे.

Related Stories

19 ऑगस्टला झळकणार ‘दोबारा’

Patil_p

कन्नड चित्रपटांमध्ये जॅकलीनची एंट्री

Patil_p

‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत’ मराठीचा बोलबाला;’गोष्ट एका पैठणीची’आणि राहुल देशपांडेंना पुरस्कार जाहीर

Abhijeet Khandekar

भावडय़ाची चावडीतून पार्थ भालेरावचे छोटय़ा पडद्यावर पर्दापण

Patil_p

एम्बर हर्डची पुन्हा न्यायालयात धाव

Patil_p

‘तारक मेहता …’ फेम ‘या’ कलाकाराला जीवे मारण्याची धमकी

Tousif Mujawar
error: Content is protected !!