Tarun Bharat

भाग्यश्रीची लेक तेलगू चित्रपटात

Advertisements

अवंतिका करणार अभिनयात पदार्पण

अलिकडच्या वर्षांमध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार किड्स लाँच झाले आहेत. यात भाग्यश्रीचा पुत्र अभिमन्यू दसानी देखील सामील आहे. अभिमन्यू सध्या ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ चित्रपटावरून चर्चेत आहे. आता त्याची बहिण मोठय़ा पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे. अवंतिका दसानी लवकरच स्वतःच्या आईप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

सध्या अवंतिकाचा बोल्ड फोटोशूट देखील सोशल मीडियावर अत्यंत ट्रेंडमध्ये आहे. अवंतिका तेलगू चित्रपटातून स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात करणार आहे. या चित्रपटाची अलिकडेच घोषणा करण्यात आली आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते बेल्लमकोंडा गणेश बाबू यांच्या चित्रपटात अवंतिका काम करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सतीश वेगेंसा करणार आहेत. अवंतिकाने स्वतःच्या ग्लॅमरस शैलीद्वारे यापूर्वीच अनेक चाहते निर्माण केले आहेत. ती दररोज इन्स्टाग्रामवर स्वतःची छायाचित्रे पोस्ट करत असते.

Related Stories

मीनाकुमारीच्या बायोपिकमध्ये क्रीति सेनॉन

Patil_p

माशुकामध्ये प्रेमाचा दिवस साजरा

Patil_p

क्रिकेटवेडय़ा सिद्धार्थला झाली दुखापत

Patil_p

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला

Patil_p

सिट्रोनची अत्याधुनिक कार लवकरच येणार

Amit Kulkarni

अभिनेते भरत जाधव यांनी केले ‘हे’ आवाहन

Tousif Mujawar
error: Content is protected !!