Tarun Bharat

भाजण्यावर उपाय

घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱयाचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा

कोरफड

कोरफडीमुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.

मध

भाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात. हे अनेक जणांना माहीत असते. मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्मयता कमी होते. मध उत्तम अँटिसेप्टीक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

सौम्य व्हिनेगर

अनेक जणांच्या घरात व्हिनेगर असते. त्यामुळे हा घरगुती उपाय करणे अगदी सोपे आहे. सौम्य व्हिनेगरमध्ये एक कापड भिजवून ते भाजलेल्या ठिकाणी लावावे. जखम बरी होईपर्यंत शक्मय तितक्मया वेळा कापड व्हिनेगरमध्ये भिजवून लावत रहावे.

सौम्य लवेंडर ऑइल

वेदना कमी करण्यासाठी हेही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. सौम्य लवेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील ‘व्हिटॅमिन सी’ आणि लवेंडर ऑइलमधील ‘व्हिटॅमिन इ’ एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण जखमेवर दिवसभर लावून ठेवावे.

केळय़ाची साल

केळय़ाची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱया करण्यास केळय़ाची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

दही

भाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल

भाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो.

थोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Related Stories

ऋतु आला लोणच्याचा

Patil_p

‘बच्चे कंपनी’ रमली स्वयंपाकघरात

Omkar B

‘व्यापारोत्सव’ एक अनुभव

tarunbharat

शोध आनंदाचा

Patil_p

झलक चित्रोत्सवाची…

Patil_p

कृतिशील मनोरंजन

Patil_p