Tarun Bharat

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्षांसह अनेकांची नावे सामील

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्वतःच्या स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहे. या यादीत एकूण 30 नावे असून ते पहिल्या टप्प्यात पक्षाच्या उमेदवारांकरता प्रचार करणार आहेत. बुधवारी निवडणूक प्रचारासाठी जारी या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नावे सामील आहेत.

कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने सध्या प्रचारसभा आणि रॅलींवर 22 जानेवारींपर्यंत बंदी घातली आहे. अशा स्थितीत नेतेमंडळी आणि राजकीय पक्ष व्हर्च्युअल सभांवर भर देत आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मुख्तार अब्बास नकवी, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, भाजप खासदार हेमा मालिनी आणि व्ही.के. सिंह यांनाही स्थान मिळाले आहे.

उत्तरप्रदेशात पहिल्या टप्प्यामध्ये 858 मतदारसंघांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यात आगरा, मथुरा, शामली, मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, हापुड, अलीगढ आणि बुलंदशहर सामील आहे. पहिल्या टप्प्याकरता 14 जानेवारी रोजी अधिसूचना जारी झाली असून 21 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

Related Stories

लालूप्रसाद यादवांची प्रकृती बिघडली

Patil_p

चीनच्याही वृत्तमाध्यमांवर बंदी घाला आयएनएसची केंद्र सरकारकडे आग्रही मागणी

Patil_p

बेंगळूर उपनगरीय रेल्वेसाठी 10,800 कोटी

Patil_p

मोहरीचा दाणा, मोडेल रोगांचा कणा

Patil_p

पंजाबमध्ये मागील 24 तासात 5,371 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

अर्थसंकल्पावर गांधीहत्येचे दृश्य

Patil_p