Tarun Bharat

भाजपचा उमेदवार दोन दिवसात होणार जाहीर

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पार्टी लढविणार आहे. यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून याबाबतचा अहवाल आजच प्रदेश कोअर कमिटीला पाठविणार आहे. येत्या दोन दिवसात पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडून उमेदवाराची घोषणा होईल, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

छत्रपती ताराराणी चौक येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. सुरुवातीला माणिक पाटील-चुयेकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर माजी नगरसेवक सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, युवा नेते दौलत देसाई, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य महेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सचिन तोडकर यांनी मुलाखती दिल्या.

Related Stories

शिये येथे अपघात, एक विद्यार्थींनी जागीच ठार तर एक गंभीर जखमी

Archana Banage

महापालिकेच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब, एकही हरकत दाखल नाही

Rahul Gadkar

ईएसआयचे चार सेवा दवाखाने मंजूर

Archana Banage

पदोन्नतीतील आरक्षण रद्दच्या शासन निर्णयाला स्थगिती नाही

Archana Banage

गोकुळ निवडणूक : अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Archana Banage

कबनूरात दोन महिलांना कोरोना लागण एक मृत्यू

Archana Banage