Tarun Bharat

भाजपचे बहुतांश उमेदवार निश्चित

दिल्लीत उद्या होणाऱया बैठकीत शिक्कामोर्तब शक्य

प्रतिनिधी /पणजी

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दोन टप्प्यांमध्ये निश्चित होणार असून बहुतांश उमेदवार हे निश्चित झालेले आहेत. केवळ औपचारिकता म्हणून उद्या दि. 16 रोजी नवी दिल्लीत होणाऱया बैठकीत उमेदवारांच्या नावावर पक्षाच्या संसदीय मंडळातर्फे शिक्कामोर्तब करण्यात येईल.

पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांद्रेची उमेदवारी दयानंद सोपटे तर पेडणेची उमेदवारी प्रवीण आर्लेकर यांना देण्यात येणार आहे. म्हापसामध्ये पुन्हा एकदा जोशुआ डिसोझा तर शिवोलीत दयानंद मांद्रेकर, थिवीमध्ये नीळकंठ हळर्णकर, हळदोणा ग्लेन तिकलो, पर्वरीमध्ये रोहन खंवटे, साळगाव जयेश साळगावकर आणि कळंगूटमध्ये गुरुदास शिरोडकर यांचे नाव निश्चित झाले आहे.

डिचोली – राजेश पाटणेकर, मये – प्रेमेंद्र शेट, सांखळी – डॉ. प्रमोद सावंत, पर्ये – विश्वजित प्र. राणे, वाळपई – दिव्या राणे, पणजी – बाबूश मोन्सेरात, ताळगाव – जेनिफर मोन्सेरात, सांताक्रूझ – टोनी फर्नांडिस तसेच सांतआंद्रेमध्ये फ्रांसिस्क सिल्वेरा यांचे नाव निश्चित झाले आहे.

दक्षिण गोव्यात भाजपची बरीचशी नावे नक्की झाली आहेत. त्यानुसार फोंडामध्ये रवी नाईक, प्रियोळ – गोविंद गावडे, मडकई – सुदेश भिंगी, शिरोडा – सुभाष शिरोडकर, सावर्डे – गणेश गावकर, कुडचडे – नीलेश काब्राल, सांगे – सुभाष फळदेसाई, काणकोण – रमेश तवडकर, केपे – बाबू कवळेकर, कुंकळ्ळी – क्लाफास डायस, मडगाव – बाबू आजगावकर, फातोर्डा – दामू नाईक तर कुडतरी – अँथोनी बार्बोझा यांचे नाव निश्चित झाले आहे.

मुरगाव तालुक्यातील मुरगाव संजय सातार्डेकर, वास्कोमध्ये दाजी साळकर तर दाबोळीची उमेदवारी माविन गुदिन्हो यांना निश्चित झालेली आहे. कुंभारजुवेत रोहन हरमलकर किंवा सिद्धेश श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.  कुठ्ठाळी मतदारसंघाबाबत भाजपमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. मुरगावमध्ये भाजपला आपला उमेदवार बदलावा लागलेला आहे. पक्षाचे बहुतेकांचे म्हणणे मिलिंद नाईक यांना उमेदवारी द्यावी असेच मत आहे. तथापि त्यांना जर पुन्हा उमेदवारी दिली तर त्याचा परिणाम पक्षाच्या इतर मतदारसंघावर होईल. त्यामुळे भाजप आता फार मोठी जोखीम पत्करणार नाही.

Related Stories

कोरोना निगा केंद्राची सेवा देणारे गोवा हे एकमेव राज्य

Omkar B

स्थानिक कंत्राटदारांना संपविणाचा प्रयत्न

Omkar B

ऑक्सिजन : दोशींवर कठोर कारवाई करावी

Amit Kulkarni

गोव्याच्या साईभक्तावर काळाचा घाला, घुणकी येथे अपघाती मृत्यू

Archana Banage

नियोजित आयआयटीला विरोध करणाऱया 9 शेतकऱयांना समन्स

Amit Kulkarni

विष्णू वाघांच्या नावे व्यासपीठ उभारण्याचे स्वप्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!