Tarun Bharat

”भाजपचे सर्व आरोप निराधार व खोटे”

मुंबई / ऑनलाईन टीम

मनुसुख हिरेन मृत्‍यू प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून मागील काही दिवसात करण्यात आलेल्या आरोपांवरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निसाणा साधला आहे. सर्व आरोप खोटे व निराधार आहेत व कुठल्याही प्रकरणाशी महाराष्‍ट्र सरकारला जोडण्याचा त्‍यांचा प्रयत्न असफल ठरलाय, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत माध्यमांशी संवाद साधताना म्हणले की, भाजपकडून आजपर्यंत जे आरोप करण्यात आले ते खोटे व निराधार होते. या प्रकराणाशी महाराष्ट्र सरकारला जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात ते वेळोवेळी तोंडघशी पडले आहेत.मात्र सगळे आरोप खोटे ठरले आहेत. त्यांना याचा सरकारशी कोणताही संबंध जोडता आला नाही, ही खरा वस्तुस्थिती आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनापासून जे आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते करत आहेत. वारंवार ते आरोप बदलत आहेत.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, पहिला मुद्दा होता अँटेलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या. दुसरा आरोप होता परमबीर सिंग यांचं पत्र आणि रश्मी शुक्ला यांनी केलेल्या अहवालाचा तिसरा आरोप होता. रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलं होतं. ज्याचा अहवाल त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांनी आरोप केला. या तिन्हींचा एकमेकांशी संबंध नाही. वेगवेगळ्या वेळी झालेल्या या गोष्टी आहेत. यात परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये. मूळ मुद्दा दुर्लक्षित राहावा, याकरता हे केलं का? परमबीर सिंह यांना कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न झाला का? भाजपची हीच व्यूहरचना होती का? यांचं उत्तर काही महिन्यात मिळेल. रश्मी शुक्लांनी अनधिकृतपणे फोन टॅपिंग केलेलं. त्यांनी तो अहवाल ऑगस्टमध्ये दिला. त्याला सात महिने होऊन गेले. तो अहवाल दिल्यानंतर अधिवेशनही झाली. या सहा-सात महिन्यात भाजपला याची आठवण झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जातोय आणि ते उत्तर देत नासल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

वडिलांच्या अस्थीविसर्जनासाठी गोव्याचे उपमुख्यमंत्री पंढरपुरात

Archana Banage

आरटीईसाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ

datta jadhav

कर्नाटक सीईटी पुढे ढकलली

Archana Banage

कोल्हापूर : नवीन 19 कोविड केअर सेंटरची उभारणी

Archana Banage

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले!

datta jadhav

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ‘या’ व्यक्तीच्या अटकेने ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

Archana Banage