Tarun Bharat

भाजपच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा टॅक्सी चालकांचा निर्णय

आजपासून सरकारविरोधात जनजागृती करणार

प्रतिनिधी/ म्हापसा

टॅक्सी चालक, बस चालक, रिक्षा धारक या विरोधात सरकारने त्यांच्या धंद्यावर कुऱहाड चालवली असून या सर्वांचा धंदा डबघाईस गेला आहे. अशा भाजपा सरकारला कोणत्याही परिस्थितीत धडा शिकवायला पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय कळंगूट येथे झालेल्या या विविध संघटनेच्या एकत्रित बैठकीत घेण्यात आला.

कळंगूट येथे झालेल्या या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. शनिवार दि. 13 पासून सरकार विरोधात जनजागृती करण्यास सुरुवात होणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत आम्ही कदापी गप्प बसणार नाही. असे एकमतानी ठरविण्यात आले. चेतन कामत, योगेश गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. बैठकीला सुमारे 300 विविध संघटनेचे मालक चालक उपस्थित होते.

आम्ही हे जनजागृतीचे पाऊल उचलताना कुणालाही अडविणार नाही वा कुणाच्याही विरोधात कायदा हातात घेणार नाही असे चेतन कामत म्हणाले. आमचा नेमका निर्णय काय घेणार हे आताच आम्ही जाहीर करीत नाही. मात्र योग्य वेळी योग्य खेळी केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. येथे लिडर म्हणून कुणी आले नसून स्वतः मालक व संघटनेचे पदाधिकारी सरकारने आपल्या व्यवहारावर पाय ठेवल्याने ते पुढे आल्याचे सांगितले. गोवा माईल्स बंद करण्यासाठीच सर्वजण एकत्रित आल्याचे कामत म्हणाले.

पर्यटन क्षेत्राला घेऊन पुढे येऊ- योगेश गोवेकर

योगेश गोवेकर म्हणाले की, सरकारला आम्ही वेळ दिला होता. पायलट, शॅक मालक यांनाही बरोबर घेऊन जाणार आहे. सरकारने यापूर्वी स्वतःच्या फायद्यासाठी खाम व्यवसाय संपविला आहे आणि आता यापुढे पर्यटन क्षेत्रही संपवू नये म्हणून आम्ही एकत्रित येणार आहोत. 40 आमदारांना आणि खासकरून भाजपच्या उमेदवारांना निवडून न आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भाजप सरकार कसेपडेल याकडे आमचे लक्ष असेल असे त्यांनी सांगितले. सरकार बाहेरील लॉबीला आमचा व्यवसाय देतो तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही गोवेकर यांनी दिला. आम्हाला जीवंत मारले तरी चालेल मात्र आम्ही आता गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related Stories

केपे गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश नाईक

Amit Kulkarni

मनोज परब यांचा सांखळी पलिकेवर मोर्चा नेण्याचा इशारा

Amit Kulkarni

पेयजलासाठी वाघांचे संरक्षण महत्त्वाचे

Amit Kulkarni

पेडणे मतदारसंघात भाजप पक्षाचे कमळ फुलणार

Amit Kulkarni

काणकोण तालुक्यात पूर्ण स्वेच्छा लॉकडाऊन

Amit Kulkarni

हरवळे तीर्थक्षेत्रावर दोन युवक बुडाले

Patil_p