Tarun Bharat

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची राष्ट्रवादी करणार पोलखोल

मुंबई/प्रतिनिधी

देशाच्या २२ राज्यांमध्ये भाजपकडून जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत ३९ केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत. यामध्ये मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात समावेश असलेले मंत्री या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाले आहेत. हे सर्व मंत्री भाजपच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचवत आहेत. या यात्रेवर विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी भाजपच्या या जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करणार आहे.

केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असतानाही जन आशीर्वाद यात्रा काढत आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपाची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

राज्यांमध्ये सुर असलेल्या यात्रेदरम्यान भाजप नेते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहचवत आहेत. या यात्रेवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच आता आपण जन आशीर्वाद यात्रेची पोलखोल करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयात पत्रकार परिषद घेणार आहेत.

राष्ट्रवादी देशात वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, कोरोना काळात आलेले अपयश, पेगॅससच्या माध्यमातून केलेली हेरगिरी या सर्व गोष्टींचा उहापोह या पत्रकार परिषदेत केला जाणार आहे. शिवाय ओबीसी व मराठा आरक्षणात केंद्रसरकार कशी चालढकल करुन राज्यात तेढ निर्माण करत आहे हेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडलं जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी

Tousif Mujawar

वादग्रस्त पोलीस स्थानकात लॉकअप डेथ!

mithun mane

जो बायडन जरी आणले, तरी…; संजय राऊतांचा भाजपला टोला

Archana Banage

झारखंडमध्ये सामूहिक बलात्कारातील आरोपींना जमावाने जिवंत जाळले, एकाचा मृत्यू

Archana Banage

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर

Archana Banage

देशात PAN Card कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता ; निर्मला सीतारामण

Archana Banage