Tarun Bharat

भाजपच्या नगरसेवकाची नुसतीच चमकोगिरी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगरपालिका हद्दीत नव्याने आलेल्या खेड ग्रामपंचायतीतील वाढे फाटा परिसर आला आहे.त्या परिसरातील स्वच्छता आरोग्य विभागाचे कर्मचारी करत आहेत.मात्र, भाजपचे नगरसेवक मिलिंद काकडे यांची नुसतीच फोटोग्राफी गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच गाजत आहे.

शहरातील नव्याने हद्दीत समाविष्ट झालेल्या भागात सुविधा देण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी पालिका प्रशासनास सूचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्राधान्य देऊन कचरा कुठे राहू नये, रस्त्यावरील लाईट जाऊ नये याकरिता काळजी घेत संबंधित विभागाला सूचना दिल्याने ते विभाग कामात व्यस्त आहे.वाढे फाटा, मिलिंद हौसिंग सोसायटी आदी भागात दररोज आरोग्य विभागाचे कर्मचारी कचरा उचलून स्वच्छता करत आहेत.असे असताना भाजपचे नगरसेवक मिलिंद काकडे यांनी गेल्या आठ दिवसापासून चमकूगिरी सुरू केली आहे.एकदा पाण्याच्या टाकीवर चढून स्टंट केला होता तर कचरा उचलल्याचे फोटो शेशन चांगले चर्चेत होते.

Related Stories

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना रोखू नका – खा. संभाजीराजे

Archana Banage

महाराष्ट्रात 8,744 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

मैत्रिणीस जबरदस्तीने दारु पाजून विनयभंग

Amit Kulkarni

“भाजपा नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”

Archana Banage

सातारा : लॉकडाऊनचा गैरफायदा, संगममाहुलीत अवैध वाळू उपसा

Archana Banage

कत्तलीसाठी आणलेल्या 26 जनावरांची सुटका

Patil_p