Tarun Bharat

भाजपच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वास घेण्यास त्रास; विमानाने मुंबईतील रुग्णालयात हलवले

ऑनलाईन टीम / भोपाळ : 


मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होवू लागल्याने आज मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांना शहरातील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार कार्यालयाने दिली. 


प्रज्ञा सिंग ठाकूर यांना एका महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारीला त्यांना अशाच मुद्द्यांसाठी नवी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (एम्स) येथे नेण्यात आले होते. यापूर्वी, कोविड – 19 ची लक्षण दिसू लागल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले होते.


दरम्यान, 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी म्हणुन त्यांचे नाव घेतले जाते. या दुर्घटनेत 10 लोक ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. 2017 मध्ये त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला होता. 

Related Stories

तामिळनाडूत भाजपला झटका, 13 नेत्यांची सोडचिठ्ठी

Patil_p

सद्यःस्थितीचे कारण दाखवून आरोग्य विम्याचा लाभ नाकारता येणार नाही !

Patil_p

बिहारमध्ये महागठबंधन सरकार; नितीश कुमार मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

Archana Banage

माणसाची इच्छापूर्ती कधीच होत नाही

Patil_p

आचारसंहिता भंगप्रकरणी लालूंना मोठा दिलासा

Patil_p

एअर इंडिया झेपावत राहणार

Patil_p