Tarun Bharat

भाजपच्या माजी आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / अहमदनगर

आजपर्यंत आपण शेतकरी,श्रमिक, कामगार, एस टी कर्मचारी या घटकांना आत्महत्येचा प्रयत्न केला, अथवा आत्महत्त्या केल्याचे आपण वाचले ऐकले असाल मात्र आता अहमदनगरमधील कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी भाजपाच्या माजी आमदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज वितरणच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.

अहमदनगरमधील नेवासा येथे शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात आंदोलन करताना माजी आमदार मुरकुटे यांनी टोकाचं पाऊल उचललं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेवासा येथे वीज तोडणीविरोधात विज वितरण कार्यालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात येत होते.

यावेळी बाळासाहेब मुरकुटेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. याचवेळी मुरकुटे यांनी विज तोडणीविरोधात आक्रमक होत नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी मुरकुटे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Stories

पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही, पण त्यांची वागणूक…; प्रकाश आंबेडकरांची टीका

Archana Banage

आंबोली घाटात दरीत कोसळला तरुण !

Anuja Kudatarkar

`एनटीपीसी’मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करणे शक्य

Archana Banage

कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा

datta jadhav

‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत

datta jadhav

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

Archana Banage
error: Content is protected !!