Tarun Bharat

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक; ‘या’ विषयांवर होणार चर्चा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्ली येथे होणार आहे. काही राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला बसलेला धक्का लक्षात घेता पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या रणनीतीचा विचार या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली.

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे 124 सदस्य उपस्थित असणार आहेत. ही बैठक ‘हायब्रिड’ पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. म्हणजेच दिल्लीतील बैठकीला काही सदस्य वैयक्तिकरित्या उपस्थित राहतील. तर काही सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.

नुकत्याच झालेल्या 13 राज्यांमध्ये 3 लोकसभा आणि 29 विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला संमिश्र कल मिळाला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांची रणनिती या बैठकीत ठरवली जाऊ शकते. बैठकीत पक्षाचे सदस्य राष्ट्रीय विषयांवर आणि अजेंडय़ावर चर्चा करतील. यावेळी पक्ष मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमाचे बैठकीच्या ठिकाणी प्रदर्शन करेल.

Related Stories

नासाची नवीन शक्तिशाली अंतराळ दुर्बीण प्रक्षेपित

Abhijeet Khandekar

सलग दुसऱया दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ

Patil_p

त्र्यंबकेश्वरमधील वर्षांनुवर्षांची परंपरा मोडीत काढणे योग्य नाही

datta jadhav

बोटावर बसविला जाणारा टुथब्रश

Patil_p

वाराणसी ते बोगिबील दरम्यान क्रूझ सेवा

Patil_p

मागील वर्षी तीन दशकातील उच्चांकी बेरोजगारी दर

Patil_p
error: Content is protected !!