Tarun Bharat

“भाजपनं काश्मीर फाईल्सची तिकीटं वाटली तशीच पेट्रोलची कूपन्सही वाटावीत”

राज्यस्थान काँग्रेस मंत्र्याचे वक्तव्य

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीआधी चार महिन्यांसाठी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. नोव्हेंबरपासून देशात कोणतीही इंधनवाढ झालेली नव्हती. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालांनंतर आणि रशिया-युद्धामुळे देशात गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी संपूर्ण चित्रपटगृहे बुक केली आहेत. यावरून राजस्थानच्या काँग्रेस मंत्र्यांनी निशाणा साधला आहे. मोदी सरकारने काश्मीर फाईल्स चित्रपटाचे तिकीट वाटले. तसेच पेट्रोलचे कूपन वाटा, असं मंत्री प्रताप खाचरीयावास म्हणाले.

भाजपच्या नेत्यांसह स्वतः पंतप्रधांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यामुळे काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातील भाजप नेत्यांनी संपूर्ण चित्रपटगृहे बुक केली. तर काहींनी विनामूल्य तिकिटे वाटली आहेत. नागरिकांनी चित्रपट पाहावा यासाठी आणि चित्रपट पाहण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी मोफत स्क्रीनिंगचे आयोजन केले. त्यावरूनच राज्यस्थान काँग्रेस मंत्री खाचरीयावास यांनी टीका केली आहे. भाजपने निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. ते ‘रामभक्त’ नसून ‘रावण भक्त’ आहेत. त्यांच्या मंत्र्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या चित्रपटाची तिकिटे वाटली, त्याचप्रमाणे त्यांनी पेट्रोल, डिझेलचे कूपन वितरित करायला पाहिजे, अशी मागणी मंत्री प्रताप खाचरीयावास म्हणाले. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.

Related Stories

पंजाबचे मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

पंधरा दिवसात तीन अभिनेत्रींची आत्महत्या

Patil_p

महाराष्ट्र सत्तासंघर्ष निर्णयाची प्रतीक्षा

Amit Kulkarni

इस्लामिक स्टेटकडून गौतम गंभीरला धमकी

Patil_p

खासगी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर निश्चित

Patil_p

प्रजासत्ताक दिन संचलन अर्धा तास विलंबाने सुरू होणार

Patil_p