Tarun Bharat

भाजपने आतापर्यंत काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन का केलं नाही – तोगडिया

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशात सध्या The Kashmir Files चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकजण या चित्रपटाचे समर्थन करत आहेत तर काहीजण या चित्रपटावर टीका करताना दिसत आहेत. स्वतः पंतप्रधानांनी हा चित्रपट बनविल्याने कौतुक केले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही या चित्रपटावर आणि भाजपच्या भूमिकेवर भाष्य करत भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या बाबतीत जे घडलं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देशभरात ‘दोन मुलं’ धोरण लागू केलं पाहिजे. सध्या देशात दोन अपत्य धोरण लागू करण्याची वेळ आलीय. जर हे धोरण लागू केलं नाही, तर 30 वर्षांनंतर संपूर्ण देशभरात ‘फायली’ तयार करण्याची वेळ येईल. भरूच फाइल्स, वडोदरा फाइल्स, भारत फाइल्स अशा कितीतरी फायली कराव्या लागतील, असं स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलं. तसेच तोगडिया यांनी दावा केलाय की, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भाजप आतापर्यंत काश्मिरी पंडितांचं का पुनर्वसन करू शकली नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं थेट आव्हान त्यांनी केलंय.

Related Stories

मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दाखल केला गुन्हा

Archana Banage

बिहारमध्ये दलित समाजातील दोघांची गोळ्या झाडून हत्या

datta jadhav

देशातील सर्व विघ्न दूर होवोत, देवेंद्र फडणवीसांचं बाप्पाला साकडं

Archana Banage

ज्योतिरादित्य सिंधियांनी बदलला इतिहास

Patil_p

मतदार कार्ड-आधार जोडणी विधेयक लोकसभेत संमत

Patil_p

बझारमधुन महिला ग्राहकाचे सापडलेले सोन्याचे घंटण

Archana Banage