Tarun Bharat

भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच

मुलाला तिकीट मिळाल्यास खासदारकी सोडेन

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अशा स्थितीत भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी देखील नाराज असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान रीता बहुगुणा जोशी यांनी स्वतःची भूमिका मांडली आहे. माझा मुलगा 12 वर्षांपासून भाजपचे काम करत असल्याने उमेदवारीची मागणी केली आहे. हा त्याचा अधिकार देखील असल्याचे त्या म्हणाल्या.

रीता बहुगुणा जोशी यांच्या मुलाने लखनौ कँट मतदारसंघासाठी दावा केला ओ. जर पक्षाने माझ्या मुलाला उमेदवारी दिल्यास मी संसद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास तयार आहे. माझी भूमिका भाजप नेतृत्वाला कळविली असल्याचे त्यांनी सांगितले.

एका कुटुंबातून एकाच व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने लागू केला आहे. अशा स्थितीत माझ्या मुलाला लखनौ कँटमधून तिकीट मिळाल्यास मी खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक मी लढविणार नसल्याची घोषणा यापूर्वीच केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अनेक खासदारांकडून अशीच मागणी

भाजपमधील अनेक खासदार स्वतःचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी स्वतःच्या मुलामुलींना निवडणुकीच्या मैदानात उतरवू पाहत आहेत. प्रयागराजच्या खासदार रीता बहुगुणा जोशी या लखनौ कँट मतदारसंघातून स्वतःचे पुत्र मयंक जोशी यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात त्या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. याचबरोबर सलेमपूरचे खासदार रवींद्र कुशवाह स्वतःचे कनिष्ठ बंधू जयनाथ यांना भाटपाररानी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवून देऊ पाहत आहेत. कानपूर नगरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी स्वतःच्या मुलासाठी गोविंदनगर मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह याचे बंधू नीरज सिंह हे लखनौ कँट आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाकरता दावा करत आहेत. लखनौच्या मोहनलालगंज मतदारसंघात खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यावेळी पुत्र विकास याच्याकरता महिलाबाद तर दुसरा पुत्र प्रभात याच्यासाठी सिधौली मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत.

Related Stories

कोरोनाचा कहर : बुधवारी देशात 4.12 लाखांपेक्षा अधिक रुग्ण; 3,980 मृत्यू

Tousif Mujawar

मध्यमवर्गाला वैद्यकीय विम्याची गरज

Patil_p

काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसतेय तृणमूल

Patil_p

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 54.13 टक्के

datta jadhav

“कुंभमेळ्याची चूक कमी म्हणून की काय आता चार धाम यात्रा”

Archana Banage

राजस्थान-गुजरातमार्गे घुसखोरीचा पाकचा कट

Patil_p