Tarun Bharat

भाजपमध्ये घराणेशाहीला विरोधच: पंतप्रधान मोदी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. यानंतर दिल्लीत आज संसदीय पक्षाची बैठक होत आहे. दिल्लीच्या आंबेडकर भवनात सुरु असलेल्या या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व मोठे नेते उपस्थित आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी भाजपच्या खासदारांना संबोधित करत घराणेशाही, युक्रेनमधून भारतीय विद्यार्ध्यांची घरवापसी आणि काश्मीर फाइल्स अशा विविध विषयांचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान म्हणाले की, घराणेशाही असणारे पक्ष हे देशाला आतून पोखरुन काढत आहेत. भाजप खासदारांच्या मुलांना माझ्यामुळे तिकीट मिळालेले नाही. कारण हे घराणेशाहीमध्ये येते आणि भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही असे ते म्हणाले.

दरम्यान, मोदींनी खासदारांच्या मुलांना तिकीट न देणे पाप असेल तर, मी हे पाप केले आहे असे विधान त्यांनी आजा भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत केले आहे, तसेच पक्षात घराणेशाही चालणार नसून, घराणेशाहीच्या राजकारणासाठी इतर पक्ष असल्याचे मोदींनी पक्षातील खासदारांना दिली आहे, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. मोदी म्हणाले की, जर कोणाचे तिकीट कापले असेल, तर त्याची जबाबदारी माझी आहे. यावेळी मोदींनी सर्व खासदारांना निवडणुकीत भाजपच्या काही जागांवर मिळालेल्या पराभवाचे मूल्यांकन करण्यासही सांगितले आहे.

Related Stories

मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी : माजी न्या. इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली समिती

datta jadhav

दिल्ली कॅपीटल्सला धक्का! अश्विनने ‘या’ कारणासाठी घेतला IPL मधून ब्रेक

Tousif Mujawar

धक्कादायक!बनावट दागिने देऊन राष्ट्रीय बँकेसह पतसंस्थेचे फसवणूक

Rahul Gadkar

सीमाभागातील संस्था, संघटनांना बळ देणार

Patil_p

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले!

datta jadhav

राहुल गांधींचे ट्विटर अकौंट अनलॉक

Patil_p