Tarun Bharat

भाजपविरोधात पवारांची मोर्चेबांधणी, 15 पक्षांची बोलावली बैठक

ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधातील मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याची माहिती समोर आली आहे. यातच आज, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पवार यांची भेट घेतली आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच पवार यांनी उद्या, मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आले आहे. तर, बैठकीला काँग्रेसला आमंत्रण आहे की नाही याबाबतची अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

राष्ट्रमंचच्या बॅनरखाली विरोधक एकत्र आल्यास भाजपला धक्का देणं सोपं जाईल. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने राष्ट्रमंच नावानं नवी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधीही यूपीएचं अध्यक्षपद पवारांकडे देण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र, काँग्रेसने याला नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रमंच नावानं तिसरा पर्याय निर्माण करून त्यांचं नेतृत्व पवारांकडे दिलं जाण्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्याच्या या बैठकीतूनच पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

तर, भाजपने 2024 ची निवडणूक मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांकडून आतापासूनच पाऊले उचलली जात असल्याचे यावरुन दिसून येते.

Related Stories

पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी

datta jadhav

पाँडिचेरीत सोमवारी विश्वासदर्शक ठराव

Amit Kulkarni

धर्मांतरांमुळे सामाजिक ताणतणावांमध्ये वाढ

Patil_p

रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ञांना कोरोनाची लागण

Archana Banage

पंतप्रधान मोदींची परवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Patil_p

एचआयव्ही विरोधी लसीचे मानवी परीक्षण लवकरच

Patil_p