Tarun Bharat

“भाजपची अवस्था म्हणजे, मी नाही त्यातली आणि…”, पिंपरी-चिंचवड पालिका भ्रष्टाचारावरून शिवसेनेचा खोचक टोला


मुंबई/प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप शिवसेनेवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. दरम्यान, कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याआधी सत्तेत असणारे दोन्ही पक्ष वेगळे झल्यानंतर एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागत आहेत. आत्तापर्यंत भाजपाकडून मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रसंग आले. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच लाच प्रकरणात एसीबीनं थेट पालिकेत दिवसाढवळ्या अटक केल्यानंतर शिवसेनेनं भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. बुधवारी अचानक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. यावाळी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. यावरून सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या अग्रलेखामधून भाजपावर टीका करताना पिंपरी चिंचवड पालिकेत घडलेल्या प्रकारामुळे शहराची ‘इज्जत’ गेल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. “भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेवर बुधवारी अचानक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. एसीबीने अचानक केलेल्या या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयातच एसीबीनं धाड टाकल्यावरून शिवसेनेनं भाजपावर परखड टीका केली आहे. परंतु “बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे त्यामुळे नाकच कापले गेले”, असं या अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.

Related Stories

हत्यारांचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर पावणेतीन लाखांची लूट

Abhijeet Khandekar

बीएसएफच्या आणखी 21 जवानांना कोरोनाची बाधा

tarunbharat

ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही : उपमुख्यमंत्री

Archana Banage

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी संजयकुमार यांची नियुक्ती

Tousif Mujawar

कोरोचीत एकाचा अहवाल निगेटिव्ह, आठ जण विलगीकरण केंद्रात दाखल

Archana Banage

आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना

Archana Banage
error: Content is protected !!