Tarun Bharat

“भाजपसोबत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री असतो”

Advertisements

काँग्रेसमुळे सगळं संपलं

म्हैसूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री ज एच.डी. कुमारस्वामी यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सोबत युती आणि मुख्यमंत्री पदाबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे. “भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,” असं म्हणत कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे. मैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

काँग्रेसमधील काही आमदारांनी बंडखोरी करत राज्यात सत्तेत असणार काँग्रेस-जेडीएस सरकार पडलं होत. याचा राग अजूनही कुमारस्वामी यांच्या मनात आहे. दरम्यान कुमारस्वामी यांनी “मी आता सुद्धा मुख्यमंत्री असतो, जर भाजपासोबतचे संबंध चांगले ठेवले असते तर. मी २००६-२००७ मध्ये आणि १२ वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून गमावून टाकलं,” असं ते म्हणाले म्हणाले.

“मी २००६-०७मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेचा विश्वास संपादित केला होता. तो विश्वास पुढचे १२ वर्षे टिकवून ठेवला. पण, काँग्रेसची साथ पकडल्यानंतर सगळं काही गमावून बसलो. २०१८ मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धरामय्या आणि त्यांच्या समर्थक गटाने माझी प्रतिष्ठा संपवून टाकली. मी फक्त त्यांच्या जाळ्यात फसत गेलो, कारण देवेगौडा यांच्यामुळे आघाडीसाठी सहमत होते,” असं कुमारस्वामी यांनी म्हंटल आहे.

दोन वर्षांपूर्वी २०१८मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस व जनता दल सेक्युलरने एकत्र येऊन कर्नाटकात सरकार स्थापन केलं होतं. यावेळी एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती.

Related Stories

कर्नाटकात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी घट

Abhijeet Shinde

राज्यात 23 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा जोर कायम

Amit Kulkarni

कर्नाटकात मागील २४ तासात १ हजार ५३१ नवीन रुग्ण, तर १९ मृत्यू

Abhijeet Shinde

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बेंगळूर कोविड केअर सेंटरला दिली भेट

Abhijeet Shinde

अन्नत्थेने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीला टाकले मागे

Sumit Tambekar

कर्नाटक : राज्यात ६४५ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!