Tarun Bharat

“भाजपा नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई

महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. घरगुती गॅस दरवाढ, इंधन दरवाढ, खाद्य तेलाच्या वाढणाऱ्या किंमती यामूळे सामान्या नागरिकांचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. यामुळे मुद्यावरुन काँग्रेसने भर देत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. महागाईवर भाजपचे वाभाडे काढण्यासाठी राहुल गांधी यांनी १ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. याच परिषदेत प्रश्न विचारल्यामुळे एका पत्रकाराला बाहेर काढण्यात आल्याचा अमित मालवीय यांनी आरोप केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, “भाजप नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा.” असा टोला लगावला होता.

मालवीय यांनी ट्विट करत “आज एका ज्येष्ठ पत्रकाराला राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतून प्रश्न विचारल्यामुळे बाहेर काढण्यात आलं. हेच राहुल गांधी प्रेम आणि सहिष्णुतेच्या राजकारणाबद्दल बोलतात?” दरम्यान, अमित मालवीय यांच्या या ट्विटवर पवन खेरा यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “अशा प्रकारची नशा तुमच्यासाठी घातक आहे. हे प्राणघातक देखील असू शकतं. त्वरित जवळच्या व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क साधा.”

त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल. इतकंच नव्हे तर राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप देखील केले होते. याच पत्रकार परिषदेबाबत भाजपाच्या अमित मालवीय यांनी असा आरोप केला होता.

Related Stories

नोजल स्प्रेमुळे कोरोना रोखण्यास मदत; संशोधकांचा दावा

datta jadhav

कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

माढा तालुक्यात ६ कोरोनाबाधितांची वाढ ; एकूण ४८६ बाधित

Archana Banage

Solapur; बालिकेवर अत्याचार अन् खून; पती-पत्नीला मरेपर्यंत फाशी

Abhijeet Khandekar

अझीम प्रेमजी यांच्याकडून भरीव मदत

Patil_p

नागठाणे गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला भोसकले

Patil_p
error: Content is protected !!