Tarun Bharat

भाजप आमदारावर आठवडय़ात दुसरा गुन्हा

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई

सिद्धार्थनगर जिल्हय़ातील डुमरियागंजचे आमदार आणि भाजप उमेदवार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारावर हे पाऊल उचलण्यात आले आहे. राघवेंद्र यांच्यावर यापूर्वी आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा नोंद झाला होता.

डूमरियागंज मतदारसंघातील पेडारी मुस्तकहम गावात झालेल्या चौक सभेत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. व्हिडिओची पडताळणी केल्यावर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद गेला आहे.

हा व्हिडिओ पाच दिवसांपूर्वीचा आहे. परंतु मी उच्चारलेल्या शब्दांचा संदर्भ वेगळा होता. माझा हेतू कुणाला धमकाविण्याचा नव्हता. भाषणात उदाहरण म्हणून भूतकाळासोबत तुलना करत होतो असा दावा राघवेंद्र सिंह यांनी केला आहे.

Related Stories

चीनसोबत तणाव, बोफोर्स होणार तैनात

Patil_p

कॅफे सांभाळताहेत ऍसिड हल्ल्याच्या पीडिता

Patil_p

लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यास संक्रमण वाढण्याची भीती

Patil_p

सिरमच्या लसीची किंमत जवळपास अडीचशे रुपये

Patil_p

बॉयलर स्फोटात मेरठमध्ये 4 ठार

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये 200 गावे पाण्याखाली

Patil_p