Tarun Bharat

भाजप उमेदवारावर गोळीबार

मालदातील उमेदवार रुग्णालयात दाखल

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार गोपाल चंद्र साहा यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. साहा यांच्यावर रविवारी झालेल्या गोळीबारात ते जखमी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. साहा हे मालदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

निवडणूक प्रचारासाठी निघालेल्या भाजप उमेदवारावर रविवारी रात्री हा गोळीबार झाला आहे. मालदाच्या शाहपूर येथे प्रचार करून परतत असताना हा प्रकार घडला आहे. साहा यांच्या मानेला गोळी लागली आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालदा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बंगालमध्ये 5 टप्प्यांमधील मतदान पार पडले आहे. 22 एप्रिल रोजी 6 व्या टप्प्यातील मतदान होणार आहे. बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 5 व्या टप्प्यातील मतदानादरम्यान काही हिंसक घटना घडल्या होत्या. तर 78 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. यापूर्वी देखील तृणमूल आणि भाजप तसेच काँग्रेस नेत्यांवर हल्ले झाले आहेत.

Related Stories

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्याची गरज नव्हती : मनमोहन सिंग

prashant_c

देशात 13,203 नवे बाधित

datta jadhav

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Omkar B

पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावली

datta jadhav

पंजाबमध्ये भाजपला कलाकारांची साथ

Patil_p

12 ते 14 वयाच्या मुलांना उद्यापासून लसीकरण

Patil_p