Tarun Bharat

भाजप ओलांडणार बहुमताचा आकडा

गोरखपूरमध्ये योगींचा मोठा दावा

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील सभेत मोठा दावा केला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजप 300 चा आकडा ओलांडण्यास यशस्वी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 5 व्या टप्प्यातील मतदानानंतरच राज्यात भाजप पूर्ण बहुमताचा आकडा ओलांडण्यास यशस्वी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कँपियरगंज येथील प्रचारसभेत योगींनी समाजवादी पक्षाच्या एका नेत्याची कहाणी लोकांना ऐकविली आहे. सप नेत्याशी एकदा त्यांच्या विकास योजनांच्या प्राथमिकता यादीबद्दल संवाद साधला. सप नेत्याने पायाभूत विकास, वैद्यकीय सुविधा, रस्ते इत्यादींना प्राथमिकता नसून कब्रिस्तानकरता कुंपणभिंत निर्माण करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले होते. कब्रिस्तान हेच समाजवादी पक्षाचे विकास मॉडेल असल्याचा आरोप योगींनी केला आहे.

विकासकामांसाठी पैसा येतोय कुठून हा प्रश्न विरोधी पक्ष विचारत आहेत. परंतु विकासासाठी निधीची कमतरता राज्यात कधीच नव्हती. पूर्वी हे लोक स्वतःच्या घरांमध्ये विकासासाठी असलेला पैसा घेऊन जात होते किंवा त्यांचा अत्तरवाला मित्रा स्वतःच्या घरांच्या तिजोरीत हा पैसा भरून ठेवायचा. परंतु भाजप सरकारच्या काळात गरीबांचा पैसा पूर्णपणे त्यांच्या हातात पोहोचत आहे. आमची वृत्ती आणि धोरण दोन्ही गरीबांची सेवा हीच असल्याचे योगी म्हणाले.

Related Stories

एशियन पेन्ट्सचा नफा तेजीत

Patil_p

धक्कादायक : भरस्त्यात टोळक्याकडून तरुणीचा विनयभंग; व्हिडिओ व्हायरल

Archana Banage

म्यानमारचे 30 हजार शरणार्थी मिझोरममध्ये

Patil_p

संघ कार्यालयांमध्ये स्फोट घडविण्याची धमकी

Patil_p

ओबीसी आरक्षणासाठी केंद्राकडून पुनर्विचार याचिका

Patil_p

रविशंकर प्रसाद तामिळनाडूच्या राज्यपालपदी?

Patil_p