Tarun Bharat

भाजप कार्यकर्त्यांसह सुमित्रा महाजन पोलिसांच्या ताब्यात

ऑनलाईन टीम / इंदूर : 

मध्य प्रदेशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधरी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणाऱया भाजपच्या एक हजार कार्यकर्त्यांसह पोलिसांनी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारविरोधात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीनंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपने कलम 144 चं उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या भाजप नेत्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांसह खासदारांचाही समावेश आहे.

पोलिसांनी या भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन जिल्हा कारागृहात नेलं आहे. यात भाजपचे मध्य प्रदेश अध्यक्ष राकेश सिंग, सुमित्रा महाजन, इंदूरचे खासदार शंकर ललवानी, आमदार आणि इंदूरच्या महापौर मालिनी सिंग यांचाही समावेश आहे.

 

Related Stories

देशात कोरोनाचे पुन्हा 90 हजारांवर रुग्ण

Patil_p

पती-पत्नीचे हृदयस्पर्शी प्रेम

Patil_p

12 बांगलादेशी घुसखोरांची धरपकड

Patil_p

वेळीच उपचार घेतल्यास ‘ब्लॅक फंगस’मधून सुटका

Patil_p

कोरोनाचा कहर, दिवसभरात 19 हजार 459 नवे रुग्ण

Patil_p

देशात बाधितांची संख्या 8447

Patil_p