Tarun Bharat

भाजप खासदाराच्या सुनेवर अत्याचार; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने ट्वीट केला व्हिडीओ

मुंबई/प्रतिनिधी

वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेला मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १२ सेकंदाच्या या व्हिडीओत दिसणारी ही महिला सांगत आहे की, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे. मॅडम प्लीज मला येथून घेऊन चला. मी विनंती करते”, असं या व्हिडिओमध्ये महिला बोलताना दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ आपल्यापर्यंत आला असून पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. दरम्यान व्हिडीओत महिला आपल्या जीवाला धोका असून येथून घेऊन चला अशी विनंती रुपाली चाकणकर यांना करत आहे.

रुपाली चाकणकर यांचं ट्वीट
“वर्धा भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमधून दिली आहे.

Related Stories

मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक केला: मनीष तिवारी

Archana Banage

रश्मी शुक्ला यांना अटकेपासून दिलासा

datta jadhav

ओमिक्रॉन : अमेरिका, ब्रिटन या देशांनी घेतले ‘हे’ निर्णय

Abhijeet Khandekar

बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुण्यात निधन

datta jadhav

नाटय़मय चकमकीत एन्काऊंटर

Patil_p

चिंताजनक! जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; पाक, श्रीलंका, बांग्लादेश वरच्या स्थानावर

Archana Banage