Tarun Bharat

सुधीर मुनगंटीवार अडाणी आणि अशिक्षित आहेत – सोनम कपूर

Advertisements

तरुण भारत ऑनलाइन टीम

महाराष्ट्र विधानसभेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच LGBTQ समुदायावर (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर) टीका केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर जोरदार टीका होत आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नेही प्रतिक्रिया दिली. सोनमने इन्स्टावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका करत त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६’ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी LGBTQ समुदायाच्या (LGBTQIA) सदस्याचा विद्यापीठ मंडळात समावेश करण्यास विरोध केला. ते म्हणाले, ‘तुम्ही आता गे आणि लेस्बियन्स सदस्य म्हणून घेणार आहात का? याबाबत आतापर्यंत कोणतीही वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे का? यात उभयलिंगी आणि समलैंगिक संबंधांचा संदर्भ आहे. अजूनपर्यंत याला परिभाषीतही केलं गेलं नाही. पुढे ते म्हणाले की,’ कोणीही याला परिभाषीत करू शकलेलं नाही. एखाद्या माणसाने प्राण्याशी संबंध ठेवले तर तो प्राणी येऊन हे परिभाषीत करणार आहे का? नक्की हे चाललंय तरी काय?’

त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडून आणि सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर सोनम कपूरने त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं आहे. सोनम कपूर ची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

Related Stories

गोव्याच्या सीमा खुल्या पण महाराष्ट्राच्या सीमा बंदच

Abhijeet Shinde

फिल्मफेअरमध्ये ‘शेरशाह’चा वरचष्मा

Patil_p

अँजेलिना ‘द वीकेंड’ला करतेय डेट

Patil_p

पम्मी आणि शेवंताची तुलना होऊ शकत नाही : अपूर्वा नेमळेकर

Patil_p

मुलगी झाली हो मालिकेत भावनिक वळण

Patil_p

स्वराज्य चळवळीचा प्रारंभ म्हणजेच जिजाऊ आऊसाहेब : मृणाल कुलकर्णी

Patil_p
error: Content is protected !!