Tarun Bharat

भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र राडा; कलम 144 लागू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

त्रिपुराच्या खोवेई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी रात्री सशस्त्र राडा झाला. यामध्ये 19 कार्यकर्त्यांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर तेलियामुरा नगरपरिषदेच्या 13, 14 आणि 15 प्रभागांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. सहायक पोलीस महानिरीक्षक सुब्रता चक्रवर्ती यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली.

सुब्रता चक्रवर्ती म्हणाले, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते खोवेई जिल्ह्यातील कालितिला भागातील भाजप कार्यालयाजवळ निदर्शने करत होते. यामुळे दोन्ही बाजूंचे समर्थक आमनेसामने आले. शाब्दीक चकमकीनंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये सशस्त्र राडा झाला. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. या घटनेत दोन्ही बाजूंच्या 19 कार्यकर्त्यांसह दोन पोलीसही जखमी झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून, त्यापैकी चार जणांना न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तेलियामुरा उपविभागीय दंडाधिकारी मोहम्मद सज्जाद पी यांनी शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तेलियामुरा नगरपरिषदेच्या 13, 14 आणि 15 प्रभाग क्षेत्रात कलम 144 लागू केले आहे, हा आदेश 24 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

Related Stories

अमृतपालच्या गावात शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण

Patil_p

‘हा’ नक्की कोलकात्याचा असणार

Patil_p

आम्हीही शंख वाजवला, आता सरकारचा घंटा वाजणार : राकेश टिकैत

Archana Banage

ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

Tousif Mujawar

सिलिंडर बुकींगला 15 दिवसांची मुदत

tarunbharat

“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागा जिंकू शकत नाही”

Archana Banage