Tarun Bharat

भाजप नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

 लोणावळा / प्रतिनिधी : 

लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे गटनेते व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान करत विरोधी पक्षाला मदत करणाऱया महिला नगरसेविका गौरी मावकर व मतदानाच्या वेळी सभागृहात गैरहजर राहणारे नगरसेवक भरत हारपुडे व जयश्री आहेर या तिघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल व प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सोमवारी दिली. तर याप्रकरणी तिन्ही नगरसेवकांची पदे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे पुजारी व गटनेते देविदास कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपाच्या तिन्ही नगरसेवकांनी जाणिवपूर्वक व ठरवून आर्थिक देवाणघेवाण करत भाजपाचे गटनेते देविदास कडू, सहयोगी पक्ष असलेल्या आरपीआयचे नगरसेवक दिलीप दामोदरे व काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिर्के यांच्याविरोधात मतदान केले, गैरहजर राहिले. हा सरळसरळ विश्वासघात असल्याने या तिन्ही लोकप्रतिनिधींची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात त्यांच्यावर कसलाही विश्वास न ठेवता पक्षाचा व्हिप बजावण्यात येणार आहे. या व्हिपचे उल्लंघन केल्यास पद रद्दबातलची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, लोणावळा नगरपरिषदेत भाजपा, आरपीआय व काँग्रेस यांची सत्ता असून शिवसेना विरोधात आहे.

Related Stories

एप्रिलमध्ये 142 महिलांच्या हाती लालपरीचे स्टेरिंग

Archana Banage

एक मे पासून नगर परिषद कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप

Archana Banage

जलयुक्तची खुशाल चौकशी करावी : फडणवीस

Archana Banage

कोरोनाबाधित रूग्णांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक सेवाभावी संस्थांचा पुढाकार

Archana Banage

करमाळा येथे काँग्रेसच्यावतीने योगींच्या प्रतिमेचे दहन

Archana Banage

निजामुद्दीन येथील त्या अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह – जिल्हाधिकारी

Archana Banage