Tarun Bharat

भाजप नेते किरीट सोमय्या दौऱ्यावेळी कणकवलीत तणाव

शिवसेनेनेकडून स्क्रीन लावत कार्यकर्ते गोळा झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त

कणकवली / प्रतिनिधी-

भाजपाचे नेते, माजी खासदार यांच्या कणकवली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमय्या यांनी राणेंवर केलेल्या आरोपांची आठवण करून देताना शिवसेनेने येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर “किरीट सोमय्या तुम्ही बोलला त्याचं काय झालं? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय!” अशा आशयाचे एलईडी स्क्रीन पोस्टर झळकवले आहे. राणे परिवारावर सोमय्या यांनी केलेल्या आरोपाची आठवण यानिमित्ताने करून देण्यात आली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

शिवसेनेकडून डिजिटल स्क्रीनवर करण्यात आलेल्या या वादांच्या पार्श्वभूमीवर कार्यालयासमोर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेना कार्यालयासमोरच श्रीधर नाईक चौकात सोमय्या यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा पदाधिकारी गोळा झाले होते. त्यामुळे वातावरण काही काळ तणाव सदृश्य बनले होते. दंगल नियंत्रक पथकासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवसेनेच्या या स्टंटबाजीसाठी त्यांनी परवानगी घेतली आहे का? असा सवाल करत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही आम्हीही डीजे लावू असा इशारा दिला.


दरम्यान माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार नितेश राणे यांचे कणकवलीत आगमन होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. सोमय्या ओम गणेश या नारायण राणे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

Related Stories

100 टन धान्य वाटपातून दान उत्सव

NIKHIL_N

माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा उद्या बंद

NIKHIL_N

दापोलीत वादळी वाऱयासह पावसाचा जोर कायम

Patil_p

रत्नागिरी : रामपेठ फुणगूस आणि माखजन बाजारपेठेत घुसले पुराचे पाणी

Archana Banage

जिल्हास्तरावर मैदानी खेळात दाणोली विद्यालयाची बाजी

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : खेडमध्ये कोरोना बळींचे अर्धशतक, ५१ जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या ११५० वर पोहचली

Archana Banage