Tarun Bharat

भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात का?

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात भागिदारी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याला राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घेऊन चालवावी. मी ती वायनरी सोमय्या यांच्या नावावर करुन द्यायला तयार आहे. तसेच कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे-शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शाहांचा मुलगा ढोकळा विकतो का? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी केला.

किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर भूमिका मांडताना राऊत म्हणाले, वाईनरी कंपनीत संचालक असणं गुन्हा आहे का? भाजपच्या नेत्यांची मुलं केळी विकतात का? किरीट सोमय्यांचा मुलगा चने शेंगदाणे विकतो का? अमित शाहांचा मुलगा ढोकळा विकतो का? देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची मुलं वांद्र्याच्या किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल टाकणार आहेत का? की डान्सबार टाकणार आहेत नाचवायला? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपच्या लोकांनी अशा प्रकरारचं घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे, हे त्यांच्यावर उलटणार आहे. तुम्ही आमच्या कुटुंबापर्यंत आला. मात्र, तुमच्या सारखी आमची मुलं ड्रग्ज विकत नाहीत. भाजपच्या किती लोकांच्या वाईनरी आहेत, हे आधी तपासा, असेही राऊत म्हणाले.

Related Stories

इचलकरंजीत आज सायंकाळी ६ पर्यंत ७४ पॉझिटिव्ह

Archana Banage

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये नमाजानंतर सुरक्षा दलावर दगडफेक

Archana Banage

सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट, 31 बाधित

Archana Banage

साताऱ्यात दोन्ही राजेगटांत घमासान

Archana Banage

आरक्षणावर मंत्री नारायण राणे, दानवे गप्प का?; संजय राऊतांचा सवाल

Archana Banage