Tarun Bharat

भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. तरीही ठाकरे सरकारकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा धडक मोर्चा काढला. या मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य प्रमुख नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होते. दरम्यान, मेट्रो सिनेमा परिसरात पोलिसांनी हा मोर्चा अडवून देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

आझाद मैदानातून विधानभवनाकडे मोर्चा जात असताना मेट्रो सिनेमा परिसरात पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, नितेश राणे, प्रसाद लाड यांच्यासह काही महिला नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी भाजप नेते स्वत:हून पोलीस व्हॅनमध्ये जाऊन बसले. या नेत्यांना नेमके कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समजू शकले नाही.

Related Stories

सीपीआर मधील लिपीक लाचलुचपतच्या जाळयात

Archana Banage

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणांमधील समन्वय उल्लेखनीय – पालकमंत्री जयंत पाटील

Archana Banage

राधानगरी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी

Archana Banage

कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील – विजय वडेट्टीवार

Archana Banage

नवीन वाहतूक दंडातून ऍटो रिक्षांना वगळा

Patil_p

तीन पानी जुगार खेळणारे सातजण ताब्यात

Patil_p